राहुरीचे स्वीकृत नगरसेवक डॉ.मयुर चुत्तर यांचा डागा परिवारातर्फे सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

राहुरीचे स्वीकृत नगरसेवक डॉ.मयुर चुत्तर यांचा डागा परिवारातर्फे सत्कार

 राहुरीचे स्वीकृत नगरसेवक डॉ.मयुर चुत्तर यांचा डागा परिवारातर्फे सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राहुरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी डॉ.मयुर राजेंद्र चुत्तर यांची नुकतीच निवड झाली आहे. राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच जिल्हा बँकेचे संचालक अरूण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.चुत्तर यांना ही संधी मिळाली आहे. डॉ.चुत्तर हे नगरमधील जय आनंद महावीर युवक मंडळाचे प्रमोद डागा यांचे भाचे असून या निवडीबद्दल डागा परिवारातर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र डागा, अशोक डागा, छायाताई चुत्तर, योगेश चुत्तर आदी उपस्थित होते.
प्रमोद डागा म्हणाले की, डॉ.मयुर यांची नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी झालेली निवड ही आमच्या परिवारासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. वैद्यकीय व्यवसाय करतानाच डॉ.मयुर हे सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. राहुरीतील महावीर मंडळाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. आरोग्य जागृतीसाठीही ते कायम प्रयत्नरत असतात. त्यांच्या यशाचा आलेख भविष्यात आणखी उंचावत राहो, अशा शुभेच्छा डागा यांनी दिल्या.
   डॉ.मयुर चुत्तर म्हणाले की, नगरमध्ये मामांच्या परिवाराकडून झालेला सत्कार चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. स्वीकृत नगरसेवकपद मिळणे ही आपल्यासाठी मोठी संधी असून या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहिल. स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल डॉ.चुत्तर यांचे राहुरीच्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, मुख्याधिकारी डॉ.श्रीनिवास कुर्हे, राहुरी जैन संघटनेचे पदाधिकारी संतोष लोढा यांच्यासह सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment