भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण

 भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण

सर्वसामान्य नागरिकांना त्रास ठरणार्‍या अवैधधंद्यांवर कारवाई करण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. अनेक अवैधधंदेवाल्यांचे राज-रोसपणे कलेक्टर संबोधल्या जाणार्याशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात आल्याने त्या अवैधधंद्यांवर कारवाई केली जात नाही. पोलीसांकडे तक्रार करणार्यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैधधंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, या अवैधधंद्यांवर कारवाई करुन आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
   भिंगार परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. तर मटका, जुगार अड्डे दिवसाढ्यवळ्या सुरु आहेत. सर्वांच्या नजरेस पडणारे हे अवैधधंद्यांकडे पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी येथील सहा. पोलीस निरक्षकांचे निलंबन करण्यात आले. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत मोठी घटना घडल्यास देखील गांभीर्याने घेतले जात नाही. वास्तविक भिंगार येथील शुक्रवार बाजारपेठेत अंड्या वाल्या शेजारी, नेहरु मार्केट, मुख्य चौकात, भिंगार येथील पाण्याची टाकी, मारुती मंदिर समोर, वडारवाडी नाका, नागरदेवळे, वाकोडी, दरेवाडी, विजय नगर चौकात, पाथर्डी रोडवरील एका लॉजवर आदी ठिकाणी अवैधधंदे खुलेआम सुरु आहेत.  
   या ठिकाणी नेहमीच शहरातील मोठ्या गुन्हेगारांचा कायम वावर असतो. परंतु याकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. भिंगार कॅम्प हद्दीत जुगार अड्डावरील एखादी कारवाई सोडली तर विशेषतः कोणतीही मोठी कारवाई काही दिवसांपासून झालेली नाही. अवैधधंदेवाल्यांचे राज-रोसपणे कलेक्टरशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची दबक्या आवाजात चर्चाही आहे. यामुळेच कदाचित भिंगारमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असेल असो, परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती, दारुडे येथील नागरिक व महिलांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पुढे त्रास वाढू नये म्हणून तक्रारदार देखील पोलीसांकडे जात नाही. तर एखाद्या अवैधधंद्याची तक्रार जरी केली तर, त्यांचे नांव उघड होऊन गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून तक्रारदारांना त्रास देण्याचे काम सुरु होते. यामुळे भिंगार कॅम्प हद्दीत तेरी भी चुप, मेरी भी चुप असा प्रकार सुरु असून, अवैधधंदे तेजीत सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घालून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैधधंदे बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment