मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करा ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करा ः गाडगे

 मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करा ः गाडगे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी प्रौढ शिक्षण विभागाचे संचालकांना निवेदन दिले आहे अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
    मॅट्रिक पूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती हे अल्पसंख्यांक समाजातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी गरजेची आहे. तरी अल्पसंख्यांक समाजातील शिकणार्‍या इयत्ता पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना 5000 रुपये शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी मिळावी., संचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे,  यांच्याकडून  21 जानेवारी 2021 रोजीच्या पत्रान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2020-21 नवीन व नूतनीकरण अर्जाची पडताळणी करणे बाबतचे आदेश देण्यात आले आहे. ज्यामध्ये गेले पाच वर्षा उत्पन्नाचे तहसीलदारांचे दाखले, रहिवाशी दाखला, आधार कार्ड,धर्मा बाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र व बँक पासबुक पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि हे सर्व रेकॉर्ड मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी गेले पाच वर्षाचे रेकॉर्ड जमा करून पंचायत समिती व आपल्या शिक्षण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश त्वरित थांबवण्यात यावे सध्या हळूहळू शाळा सुरू होत आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत इतरही कामे आहेत.  अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या नावे ऑनलाइन कामासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना तीन चार महिने यामध्ये गुंतवले जात आहे. यामध्ये  पडताळणीचा आदेश अन्यायकारक आहे.  अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती कामासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना  जुंपण्यात येवू नये तसेच मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द कराव्यात,.अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने  करण्यात आली. तसेच या जाचक अटी रद्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असे शिक्षक भारती संघटनेचे शिक्षक नेते तथा राष्ट्रीय सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी शेख, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर ङोंगरे , संभाजी पवार. संतोष मगर . संजय तमनर, संतोष देशमुख , योगेश हराळे, नवनाथ घोरपडे. गोरखनाथ गव्हाणे,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, मुजीफ शेख. इम्रान खान. संभाजी चौधरी, किसन सोनवणे, कैलास जाधव,  ,सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे. जॉन सोनवणे आदींनी दिला आहे.

No comments:

Post a Comment