होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा

 होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील 75 हजार होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृती समितीच्या शिष्टमंडळाने नगरमध्ये भेट घेऊन चर्चा केली. यासाठी आ.संग्राम जगताप यांनी विशेष पुढाकार घेतला.
   याप्रसंगी डॉ.विजय पवार यांनी ना.अजित पवार यांना होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत माहिती देतांना सांगितले की, राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरी उपलब्ध नाही, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांमध्ये आयुष संचालक व एनआरएचएम विभाग उपसंचालक यांच्या पुर्वग्रह दुषित भुमिकांमुळे स्थान न मिळणे, 2016 पासून सुरु असलेल्या सीसीएमपी कोर्स डॉक्टरांची रखडलेली नोंदणी प्रक्रिया, 108 अ‍ॅम्ब्युलन्सवर नियुक्ती न मिळणे आदि प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पानंतर होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत मी वैय्यक्तिक लक्ष देईल. यासाठी संबंधित मंत्री गटाची मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊन त्यावेळी सर्व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन मार्ग काढू असे आश्वासन दिले. यानंतर कृती समितीच्यावतीने ना.अजित पवार यांचे आभार मानून पुढील मुंबई येथे होणार्या बैठकीबाबत आ.संग्राम जगताप यांच्यशी चर्चा केली.याप्रसंगी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विजय पवार, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.अशोक भोजने, डॉ.रणजीत सत्रे, डॉ.विनय गरुड, डॉ.मनिष थवानी, डॉ.नितीन झावरे, डॉ.सुबोध देशमुख, डॉ.पी.एस.आहुजा, डॉ.दिलीप दरंदले, डॉ.शंकर आहुजा, डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.संजीव गडगे, डॉ.जगदीश निंबाळकर, डॉ.सुरेंद्र खन्ना आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here