शेतकर्‍यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन वीज बिल भरावे-ना.तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

शेतकर्‍यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन वीज बिल भरावे-ना.तनपुरे

 शेतकर्‍यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन वीज बिल भरावे-ना.तनपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

मिरी  ः शेतकर्‍यांनी शेती पंपाचे विजबिल भरताना शासनाच्या नवीन सवलतीच्या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक फायदा घ्यावा असे आवाहन ऊर्जा राज्यमंत्री तथा राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे आमदार ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी केले आहे.पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व महावितरण अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीदरम्यान तनपुरे यांनी शेतकर्‍यांना शासनाच्या नवीन योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला आहे.तसेच वीजबिल भरून सहकार्य करणार्‍या शेतकर्‍यांचे ट्रान्सफॉर्मर त्वरित सुरू करावेत व इतरांना देखील बीले भरताना मानसिक त्रास होणार नाही याचा सर्वांगीण विचार करावा अशा सक्त सूचना ना.तनपुरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
   शेतकर्‍यांनी ट्रान्सफार्मर  बंद झाल्यावर संबंधित वीज कर्मचार्याला कळल्यानंतर कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांकडून वाहन भाडे व दुरुस्तीचा खर्च  घेतल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचारी व अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील ना.तनपुरे यांनी दिला आहे.
   तसेच मागील सरकारच्या काळात सन 2018 पासून बंद असलेले शेती पंपाचे नवीन वीज कनेक्शन या सरकारच्या नवीन धोरणानुसार सुरू करण्यात आले असून त्याचादेखील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेऊन नवीन विजजोडणीसाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा.त्यामुळे नवीन जोडणी न घेता अनधिकृतपणे विजेचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांवर रीतसर कारवाई करण्याचा विचार केला जाईल असे देखील ना.तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे.
   यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता मनिषकुमार सूर्यवंशी,गाळणी विभागाचे सहाय्यक अभियंता भरत पवार,मिरी कक्षाचे सहाय्यक अभियंता हितेश ठाकूर,करंजी कक्षाचे सहाय्यक अभियंता मिश्रा साहेब व पाथर्डी उपविभागाचे सहाय्यक अभियंता सुनील अहिरे या अधिकार्‍यांसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, जवखेडचे सरपंच अमोल वाघ, मिरीचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी,आदिनाथ सोलाट, शिराळचे सरपंच पिनू मुळे,आडगाव चे सरपंच जगन्नाथ लोंढे,ग्रामपंचायत सदस्य माणिकराव लोंढे, सुरेश बर्फे, मोहोज बु.चे माजी सरपंच शिवाजी मचे, के.एम.मचे सर, मोहोज खुर्दचे सरपंच सुधाकर वांढेकर, नामदेव सोलाट, युवा नेते राजू भाई शेख, विष्णू सोलाट आदींसह मिरी, आडगाव, रेणुकाईवाडी, शिंगवे केशव, शिराळ, मोहोज, शंकरवाडी या गावांसह परिसरातील शेतकरी व महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणकडून ग्रामपंचायतीला देखील मिळणार निधी
     आपापल्या गावातील घरगुती व शेतीपंपाच्या वीज बिलाची वसुली करणार्‍या ग्रामपंचायतींना वसूल झालेल्या रकमेच्या तीस टक्के रक्कम ही अनुदान म्हणून मिळणार असल्याने त्याचादेखील नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी विचार करून आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी जमा करण्याचा प्रयत्न करावा असेही तनपुरे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment