शिवमल्हार संघ ठरला नामदार चषकाचा मानकरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

शिवमल्हार संघ ठरला नामदार चषकाचा मानकरी

 शिवमल्हार संघ ठरला नामदार चषकाचा मानकरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील जेऊर येथील नामदार चषक सोनई येथिल शिव मल्हार क्रिकेट संघाने पटकावला.
       जेऊर येथे नामदार प्राजक्त तनपुरे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील अंतिम सामना शिव मल्हार क्रिकेट क्लब विरूद्ध रोझरी माता क्रिकेट संघा दरम्यान झाला.
     प्रथम फलंदाजी करताना शिव मल्हार संघांने 6 षटकात 93 धावा केल्या होत्या. शुभम ताके यांने उत्कृष्ट फलंदाजी करत 68 धावा केल्या. रोझरी माता क्रिकेट क्लबकडून सोमनाथ तोडमल व वाजिद सय्यद यांनी प्रत्येकी एक  गडी बाद केला. सामनावीर म्हणून शुभम ताके याला गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून साकत संघ ठरला.
      प्रथम पारितोषिक 31 हजार रु. शिव मल्हार संघ सोनई, व्दितीय पारितोषीक 21हजार रू रोझरी माता क्रिकेट क्लब जेऊर, तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये कोणार्क संघ बु-हानगर तर चतुर्थ पारितोषिक बायजा माता क्रिकेट क्लब यांनी मिळवले.
     बक्षीस वितरण समारंभ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक चेअरमन प्रेमचंद आढाव, सोमनाथ तोडमल, वाजिद सय्यद, किरण पाटोळे, अमोल पाटोळे, सुनील सोनवणे, सुमेश पानपाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment