छावणीचे थकित बील मिळण्यासाठी सिध्दार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेचे उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

छावणीचे थकित बील मिळण्यासाठी सिध्दार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेचे उपोषण

 छावणीचे थकित बील मिळण्यासाठी सिध्दार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेचे उपोषण

नियमाप्रमाणे छावणी चालवूनदेखील बिल रोखण्यात आल्याचा आरोप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नियमाप्रमाणे मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथे चारा छावणी चालवून देखील त्याचे बील अद्यापि मिळाले नसल्याने, सदरील बील त्वरीत मिळण्याच्या मागणीसाठी सिध्दार्थ सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात संस्थेचे चेअरमन जे.बी. वांढेकर, संचालिका लताबाई वांढेकर, रामनाथ म्हस्के, मंदाबाई वांढेकर, मंगल सोनवणे सहभागी झाले होते.
   मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथील सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019 दरम्यान पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांनी छावणीला परवानगी दिली होती. महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयाच्या आदेशाला अधीन राहून 150 जनावरांची अट शिथील करून संस्थेला छावणीची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे छावणी सुरु होती. आदेश यापुढे कायम केला होता. तर त्यानंतर पाऊस पुरेसा झाला नसल्याने शासनाने पुन्हा शासन निर्णयाप्रमाणे छावण्यांना मुदत वाढ दिली. त्याप्रमाणे तहसीलदार यांनी दैनंदिन अहवाल स्वीकारलेला आहे. सीदरील छावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी 150 जनावरांची अट शिथिल केल्यामुळे छावणी 10 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरु होती. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे छावणी बंद करण्यात आली. संस्थेला 31 जुलै 2019 पर्यंत छावणीचे बील मिळालेले आहे. परंतु तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांचे पत्राचे कारण सांगून 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019 चे बील नाकारलेले आहेत. मांडवे, दगडवाडी व घाटशिरस येथील छावण्यांना बील अदा करण्यात आलेले आहे. आमच्या संस्थेची 75 टक्के बील रक्कम 3 लाख 92 हजार 268 रुपये तहसीलदार पाथर्डी यांच्याकडे जमा आहे. तरी देखील तहसीलदार यांनी पेमेंट देता येत नाही असे पत्रानुसार बील नाकारले असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
   जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे छावणी बंदचे आदेश तहसीलदारांनी दिले नसल्याचे छावणी सुरु होती. सर्व छावण्या शासन निर्णयाप्रमाणे चालवण्यात आल्या असून त्याचे बीलही शासनाने दिले आहे. परंतु सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने चालवलेल्या छावणीचे बील नाकारण्यात आले असून, नियमाप्रमाणे छावणी चालवून देखील बील नाकारणार्यांवर कारवाई करावी व थकित बील त्वरीत मिळण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment