मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेत कर्तृत्व सिध्द करावे ः अतुल फलके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेत कर्तृत्व सिध्द करावे ः अतुल फलके

 मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेत कर्तृत्व सिध्द करावे ः अतुल फलके

एकता फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने अधिकारी व डॉक्टर युवक-युवतींचा सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवून अधिकारी व डॉक्टर झालेल्या गावातील युवक-युवतींचा विशेष सन्मान करण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळण्यासाठी शिवजयंती दिनी या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
   स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गावातील श्रध्दा गणेश जाधव राज्य कर निरीक्षक अधिकारी, राणी बाबासाहेब डोंगरे जल संधारण अधिकारी, नितीन चारुडे पुरातत्व विभागात उप आवेक्षकपदी तसेच स्नेहल दत्तात्रय जाधव डॉक्टर झाल्याबद्दल यांचा फाऊंडेशनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. अतुल फलके म्हणाले की, शिक्षण हेच उज्वल भवितव्याचा पाया असून, ते भक्कम केल्याशिवाय नांवलौकिक होणार नाही. बँकेत बॅलन्स करण्याऐवजी मुलांमध्ये संस्काराचे बॅलन्स केल्यास भविष्यकाळ उज्वल आहे. गावातील मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षेत कर्तृत्व सिध्द करुन गावाचे नांव उज्वल केले. हे गावाच्या दृष्टीने भुषणावहबाब आहे. तर यश मिळवणारे हे विद्यार्थी गावातील युवक-युवतींसाठी मार्गदर्शक असणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्यांनी गावातील विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम व अभ्यासाचे सातत्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून, योग्य पध्दतीने अभ्यास करण्याचा सल्ला दिला.  
   यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, अरुण अंधारे, रामदास पवार, किरण जाधव, महेश फलके, विकास जाधव, हुसेन शेख, रविंद्र जाधव, बाबासाहेब गायकवाड, सुधीर खळदकर, रितेश डोंगरे, सोमनाथ फलके, अजीत फलके, ग्रा.पं. सदस्य पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पिंटू जाधव, अनिल डोंगरे, दादा गायकवाड, शंकर गायकवाड, जालिंदर आतकर, जगदाळे, जावेद शेख, मयुर काळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment