ज्ञानवर्धिनी परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

ज्ञानवर्धिनी परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश

 ज्ञानवर्धिनी परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण येथील सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत रोख पारितोषिक व सन्मानपत्राचे मानकरी ठरले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे व विश्वस्त मुकेशदादा मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत दरवर्षी ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. संस्था शाखा व इतर संस्थेतील इयत्ता 6 वी व 7 वीचे 8 हजार 444 विद्यार्थी या जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले होते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या  जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. श्रीराम विद्यालयाने या पूर्वी दहावीचा चौदा वेळा 100 टक्के निकाल व खेळात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय प्राविण्यप्राप्त विद्यार्थी घडवले असून, या स्पर्धा परीक्षेतून संस्थेत गुणवत्तेची परंपरा अखंडित चालू ठेवून अव्वलस्थान मिळवत संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब साबळे, विजय जाधव, बाळासाहेब पिंपळे, राजेंद्र कोतकर, राजश्री जाधव, संजय भापकर, सुजय झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हास्तर गुणवत्ता यादीत इयत्ता 6 वी मधील गौरी गोडसे, संस्कृती हराळ यांनी 300 पैकी 294 गुण मिळवत द्वितीय क्रमांकाची संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांचे वतीने देण्यात येणार्या कै. श्रीमती भिवराबाई हरीभाऊ दरे शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत गायकवाड विद्या, खिलारी प्रेरणा, भापकर सोहम, देवकाते छाया व सातवी मधील कुलांगे भक्ती हे रोख पारितोषिक व सन्मानपत्राचे मानकरी ठरले. तसेच दोन्ही वर्गांचा निकाल 100 टक्के लागला.संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेकजी भापकर, संस्था निरीक्षक रंगनाथ भापकर, गावचे उपसरपंच सुधीर पाटील भापकर, सरपंच निलेश साळवे, चेअरमन रवींद्र पिंपळे आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here