ग्रामपंचायत निवडणुकांत नगर तालुक्यातील नेत्यांना सत्ता राखण्यात यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

ग्रामपंचायत निवडणुकांत नगर तालुक्यातील नेत्यांना सत्ता राखण्यात यश

 ग्रामपंचायत निवडणुकांत नगर तालुक्यातील नेत्यांना सत्ता राखण्यात यश

हिवरेबाजाच्या उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार 
आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीची 30 वषार्नंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले.


अहमदनगर : 
नगर तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत  तालुक्यातील नेत्यांना आपापल्या गावांची सत्ता राखण्यात यश आल्याचे चित्र मंगळवारी (दि 9) सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर स्पष्ट झाले.
यामध्ये नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.    जेऊरमध्ये राजश्री मगर सरपंच झाल्या. खारे कर्जुने त प्रभाकर मगर सरपंच तर अंकूश शेळके उपसरपंच पदी बिनविरोध झाले. वाळूंजमध्ये सरपंचपदी सुखदेव दरेकर तर उपसरपंचपदी अनिल मोरे यांची निवड झाली. गुणवडीत सरपंचपदी रंजना शाम साळवे व उपसरपंचपदी रावसाहेब शेळके यांची निवड झाली.
चिचोंडी पाटीलमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांची सरपंच पदी निवडून आले. निंबळकमध्ये पुन्हा लामखडे यांचे वर्चस्व सिद्ध झाले. सरपंचपदी प्रियंका लामखडे तर उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.
       उदरमल ग्रामपंचायतीत 7 पैकी 6 जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे अनुसुचित जमाती महिलेसाठी सरपंच आरक्षित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीत या प्रवर्गाचा सदस्यच नसल्याने धनगरवाडीत सरपंचपद रिक्तच राहिले. दरम्यान उपसरपंचपदासाठी मतदान झाले. उपसरपंचपदासाठी मनिषा गायके विरुद्ध अशोक विरकर अशी लढत झाली. या लढतीत दोघांनाही समान मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदाची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. चिठ्ठीत मनिषा गायके उपसरपंच झाल्या. गुंडेगावच्या सरपंचपदी मंगल सकट तर उपसरपंचपदी अपक्ष निवडून आलेले संतोष भापकर विजयी झाले.    
        दशमीगव्हाणमध्ये सरपंचपदी संगिता उद्धव कांंबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली. खडकीमध्ये सरपंचपदी प्रविण कोठुळे व उपसरपंचपदी सुरेखा गायकवाड निवडून आले. इमापूरमध्ये सरपंचपदी भीमराज मोकाटे तर उपरसरपंचपदी लक्ष्मी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. दरेवाडीच्या सरपंच पदी स्वाती बेरड तर उपसरपंचपदी अनिल करांडे यांची निवड झाली. जेऊरमध्ये राजश्री मगर यांची सरपंचपदी तर श्रीतेष पवार यांची उपसरपंच पदी निवड झाली. ससेवाडीमध्ये सरपंचपदी दत्तात्रय जरे तर उपसरपंचपदी प्रशांत ससे यांची बिनविरोध निवड झाली. डोंगरगणला सरपंचपदी वैशाली मते, उपसरपंचपदी संतोष पटारे यांची निवड झाली. बहिरवाडीला सरपंचपदी अंजना येवले, उपसरपंचपदी मधुकर पाटोळे यांची निवड झाली. खोसपुरीत सरपंचपदी नशीबाबी मुबारक पठाण उपसरपंच मीना भालेराव निवडून आल्या. पिंपळगाव माळवीत सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड झाली. इसळकच्या सरपंचपदी छाया संजय गेरंगे उपसरपंचपदी शोभा खामकर यांची निवड झाली. चिचोंडी पाटीलमध्ये सरपंचपदी मनोज कोकाटे तर उपसरपंचपदी कल्पना ठोंबरे हे विजयी झाले. पोखर्डीत सरपंचपदी रामेश्‍वर निमसे तर उपसरपंचपदी अजय कराळे, खंडाळ्यात सरपंचपदी मोहन सुपेकर उपसरपंचपदी दिपाली लोटके यांची निवड झाली.

No comments:

Post a Comment