नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने बुधवार दि.10/2/2021 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळ येथील संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावाफ असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं. 9881810333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment