हिंदवी स्वराज्य ः छत्रपतीचं लोककल्याणकारी राज्य ः राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

हिंदवी स्वराज्य ः छत्रपतीचं लोककल्याणकारी राज्य ः राठोड

 हिंदवी स्वराज्य ः छत्रपतीचं लोककल्याणकारी राज्य ः राठोड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण करुन जगातील पहिल्या स्वातंत्र्याची स्थापना केली. तत्कालीन भयभीत जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रदान केला. म्हणून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत ठरले, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते विक्रम राठोड यांनी केले.
ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आज इंप्रियल चौकात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.राठोड बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
   हिंदवी स्वराज्यात स्त्रीयांना बरोबरचे स्थान देऊन शत्रुपक्षातील स्त्रीयांचा सन्मान स्वत: छत्रपतींनी केला. लोकांच्या गवताच्या काडिलाही हात लावू नये, असा त्यांचा आदेश होता; अन् तो आदेश जनतेने नम्रपणे स्वीकारला म्हणून त्या काळी लोककल्याणकारी राज्य निर्माण झाले होते, असे अध्यक्षीय भाषणात श्री.भुजबळ यांनी सांगितले.
   माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, बारा बलुतेदार संघटनेचे ज्ञानेश्वर गायकवाड, नगरसेवक सर्वश्री शाम नळकांडे, बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, डॉ.अनिल बटाने, डॉ.श्रीकांत चेमटे, श्रीकांत मांढरे, रमेश सानप, फिरोज खान, राजेंद्र पडोळे, डॉ.सुदर्शन गोरे, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, संजय सागावकर, आदिंनी भाषणात छत्रपतींचा गौरव केला.
   सर्वश्री अनिल इवळे, नितीन डागवाले, अनिल वराडे, मार्गारेट जाधव, अनिल निकम, दिपक देहकर, रामकृष्ण राऊत, रंगनाथ फुलसौंदर, पी.के. नन्नवरे, विजय कोथिंबिरे, अशोक कानडे, पंडित खरपुडे, कैलास दळवी, परेश लोखंडे, काका शेळके सुनिता धनवटे, नईम शेख, सुमन काळापहाड, मिना धाडगे, शारदा वाघमारे, गौतमी भिंगारदिवे, छाया नवले, रजनी ताठे आदि उपस्थित होते. प्रारंभी स्वागत पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. शेवटी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment