शहर निर्मितीसाठी पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा सुरु करण्याकरिता शिवजयंती दिनी रेल्वे क्रांती आंदोलनाची घोषणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

शहर निर्मितीसाठी पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा सुरु करण्याकरिता शिवजयंती दिनी रेल्वे क्रांती आंदोलनाची घोषणा

 शहर निर्मितीसाठी पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा सुरु करण्याकरिता शिवजयंती दिनी रेल्वे क्रांती आंदोलनाची घोषणा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या ऐतिहासिक लोखंडी पुला शेजारी पुणे-नगर जुळे शहर निर्मितीसाठी पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा सुरु होण्याकरिता रेल्वे क्रांती आंदोलनाची घोषणा करण्यात आली. विश्व इतिहाससाक्षी सूर्यनामा करुन अलेक्झांडर से सवाई महान शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. तर आजीव आंदोलकांचा फेटे बांधून शिवसन्मानाने गौरव करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक सब्बन, अ‍ॅड. कारभारी गवळी, सुखदेव चौरे, किशोर झरेकर, बळीराव पाटोळे, दिनेश वाजे, नंदाबाई साबळे, आर.आर. पिल्ले, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, शहादेव चव्हाण, पोपट भोसले आदी सहभागी झाले होते.  
   हरजितसिंह वधवा म्हणाले की, नगर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनातून पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा महत्त्वाची ठरणार आहे. मागील दहा वर्षापासून ही रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. दौंडला कॉडलाईनचे काम पुर्ण झाले असताना ही सेवा तातडीने सुरु होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्शद शेख यांनी आंदोलनातून आजवर क्रांती घडल्याचा इतिहास आहे. हुकुमशाही पध्दतीने वागणार्या भाजप सरकारला आंदोलनाची भिती वाटत असल्याने आंदोलन दडपण्याचे प्रकार केले जात आहे. तर आंदोलनजीवी जमातपासून सावध होण्याची भाषा वापरली जात असून, सत्याग्रह, आंदोलन हे लोकशाहीचे शस्त्र असून सर्वसामान्यांना न्याय मागण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
   अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, नगर शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून ठप्प आहे. पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा सुरु झाल्यास शहराला आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक न्याय मिळणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात इतर देशांच्या तुलनेत भारतात रेल्वेचे जाळे पसरु शकलेले नाही. याला रेल्वे खात्याचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे. अनेक रेल्वे मंत्र्यांनी ब्रिटिशांनी दिलेल्या रेल्वे जाळ्याच्या देणगीवर सत्ता उपभोगली असल्याचा आरोप त्यांनी केला.
   जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या अलेक्झांडर पेक्षा शिवाजी महाराज श्रेष्ठ होते. अलेक्झांडरने फक्त सत्ता उपभोगली. मात्र शिवाजी महाराजांनी रयतेचे आश्रू पुसण्याचे काम केले. एक आदर्श राज्य निर्माण करुन, सर्वांसमोर त्यांनी आदर्श ठेवला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर भारताचे परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या तुलनेत भारताचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे कार्याला गती व विकासाचे व्हिजन नसल्याचा आरोप देखील आंदोलकांनी यावेळी केला.

No comments:

Post a Comment