धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले शिवाजी महाराज : खा. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले शिवाजी महाराज : खा. विखे

 धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले शिवाजी महाराज : खा. विखे

भाजपाच्यावतीने शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले नेते होते. सर्वांना बरोबर घेऊन रयतेसाठी स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराज हे एक महान पराक्रमी होते. आजच्या युवापिढीने छत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आचरण करुन त्यांची शिकवण अंगीकारावी. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आजही छत्रपतींनी अंमलात आणलेल्या विविध योजना आपण राबवतो, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एसटी स्टँड येथील अश्वरुढ पुतळ्यास भाजपाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक अनिल शिंदे, अँड. धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here