विना मास्क कारवाईचा बडग उगारताच उडाली अनेकांची धांदल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

विना मास्क कारवाईचा बडग उगारताच उडाली अनेकांची धांदल

 विना मास्क कारवाईचा बडग उगारताच उडाली अनेकांची धांदल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः विना मास्क फिरणार्‍या नागरिकांना सामाजिक अंतराचे वारंवार आवाहन करून तसेच कारवाईचा बडगा दाखवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आज सकाळी बेलवंडी येथे भरलेल्या बाजारात फिरून व्यापारी, विक्रेते, तसेच नागरिकांना आवाहन करत नियम पायदळी तुडविनार्‍या 100 ते 125 नागरिकांना 100 प्रति रूपये प्रमाणे दंडाच्या पावत्या फाडत कारवाई केली.
राज्यासह जिल्हात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांनी अनेक निर्बंध लागू करत विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाईचा बडगा दाखवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आज सकाळी बेलवंडी येथे भरलेल्या बाजारात फिरून व्यापारी, विक्रेते, तसेच नागरिकांना आवाहन करत कोरोनाचे नियम पायदळी तुडविनार्‍या सुमारे 100 ते 125 नागरिकांना तसेच विक्रेते, व्यापारी यांना 100 प्रति रूपये प्रमाणे दंडाच्या पावत्या फाडत कारवाई केली. पोलिस निरीक्षकांसह अचानक आलेल्या ताफ्याणे अनेकांची धांदल उडाली आहे. सदरच्या कारवाई सहा. फौजदार गवळी, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे, संतोष गोमसाळे, अजिनाथ खेडकर यांच्यासह बेलवंडी पोलीसांनी केली.

No comments:

Post a Comment