शेतजमीन बळकाविणार्‍या सावकारांविरोधात कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

शेतजमीन बळकाविणार्‍या सावकारांविरोधात कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा

 शेतजमीन बळकाविणार्‍या सावकारांविरोधात 

कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः
पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी घेऊन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्यांविरोधात शनिवार दि. 6 मार्च रोजी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे कन्या वारसा-धन काळीआई ताबा पडताळणी सुर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
या आंदोलनातंर्गत मुळ शेतकर्यांच्या ताब्यात असलेल्या शेतात बहिण व भाऊ नांगर चालवून जनते समोर ताबा सिध्द करणार आहे. भांडेवाडी (ता. कर्जत) येथील दळवी वस्ती येथील गट नं.185 ची 2 हेक्टर 4 आर व 186 ची 2 हेक्टर या दोन जमीनी सावकारी ताब्याशिवाय गहाण होत्या. सदर जमीनी संपत लक्ष्मण पवार, पार्वती रामचंद्र शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर, दिगंबर बाळू पवार, दिनानाथ बाळू पवार यांच्या वडिलोपार्जीत असून, त्यांच्याच ताब्यात आहे. नाना दशरथ वराळे व नानासाहेब बापूराव धांडे यांनी सावकारांकडून सुपारी घेऊन सदर शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.    
हिंदू वारसा कायद्याने मुलीला भावाप्रमाणे वडिलोपार्जीत संपत्तीत समान हक्क देणार्या 2005 च्या दुरुस्ती कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आहे. वडिल जिवंत नसले तरी त्या संपत्तीमध्ये मुलींचा भावाप्रमाणे समान वाटा आहे. तरी देखील सावकाराशी व्यवहार करणार्यांनी बहिण व भावाचा हिस्सा विचारात न घेता ताब्याशिवाय जमीन गहाण देण्याच प्रयत्न केला. सुपारी सावकारांना पाठवून सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी सावकार प्रयत्नशील असून, यासाठी शेतकर्यांची पिळवणुक सुरु आहे. सुपारी सावकारांचा बिमोड करुन पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे
या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कर्जत पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment