संतोष क्षीरसागर सर यांचा मंत्रालयात काल पार पडला सत्कार समारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

संतोष क्षीरसागर सर यांचा मंत्रालयात काल पार पडला सत्कार समारंभ

 संतोष क्षीरसागर सर यांचा मंत्रालयात काल पार पडला सत्कार समारंभ

खा.सुप्रिया सुळे,  शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांच्याकडून हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कौतुक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील वासुंदे येथील कलाशिक्षक श्री. संतोष क्षीरसागर सर यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेली अजरामर हस्तलिखित कलाकृती म्हणजे श्री ज्ञानेश्वरी सर्वांनाच अभिमान वाटेल असा त्यांचा उदात्त ध्येयवाद , कलेसाठी कला हा दृष्टिकोन , अखंड परिश्रम घेण्याची तयारी अशा अनेकविध गुणसंपन्नतेमुळे सरांनी आज यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .
ब्राह्मणे बाळबोध अक्षर ।
घडसून करावे सुंदर ।
जे पाहताची चतुर ।
समाधान पावती ॥
संत रामदासांच्या या सल्ल्यानुसार सरांची अक्षरे संगणकातील लिपी लाही लाजवतील अशीच आहेत ग्रंथनिर्मितीच्या या यशाकडे झेपावत असताना त्यांना लाभलेला संत - महंत यांचा सहवास ह.भ.प. डॉ . नारायण महाराज जाधव यांची प्रेरणा कृष्णकृपांकित डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्यासह अनेकांचे आशीर्वाद सहकारी मित्रांचे प्रोत्साहन व कुटुंबातील व्यक्तींसह नातेवाईकांची साथ या आणि अशा अनेक गोष्टींमुळे सरांचे कार्य सुकर झाले . अखेर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेची फलश्रुती म्हणजे नुकतीच झालेली शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड , खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या व आमदार -खासदारांच्या भेटी तसेच पद्मभूषण मा.आण्णासाहेब हजारे व पद्मश्री मा.पोपटराव पवार यांच्याकडून विशेष सन्मानासह झालेले कौतुक या सगळ्या गोष्टी आपल्याला अभिमानास्पद तर आहेच परंतु सरांच्या जीवनाला निश्चितच भारावून टाकणा-या आहेत.या हस्तलिखित श्रीज्ञानेश्वरीच्या 5000 प्रती वितरित करण्याचा मानस असून तो तडीस जावो हीच मनापासून सदिच्छा !
आणखी एक कौतुकास्पद कार्य श्री ज्ञानेश्वरांचे हरिपाठ म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहात वारकर्‍यांना आनंदाची पर्वणी बहुतेकांना हरिपाठाचे अभंग मुखोद्गत असतात.या हरिपाठाच्या अभंगा च्या हस्तलिखित पुस्तिकेच्या 3000 प्रती लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. खरोखरच मा. क्षिरसागर सरांच्या कार्याला मनापासून सलाम सरांच्या हातून उत्तरोत्तर असेच कार्य घडत जावो.
याचसाठी केला होता अट्टहास मला मिळालेला सन्मान हा आपल्या पारनेर तालुक्यातील थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने माऊलींच्या कृपा आशीर्वादाने मला हा सन्मान मिळाला.. मला याचा खूप अभिमान वाटतो आणि मी या सन्मानाने खूप भारावून गेलो, असे संतोष क्षीरसागर यांनी सांगितले.

याजसाठी केला होता अट्टाहास
कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असताना एक दिवस डॉ नारायण महाराज जाधव यांच्या आग्रहास्तव व माऊलींच्या कृपेने तसेच अनेक संत महंतांच्या आशीर्वादाने सर्व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन करण्याचे भाग्य लाभलं.आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपाशीर्वादाने हे स्वप्न साकार झाले.

No comments:

Post a Comment