चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 15, 2021

चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळला.

 चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळला.

खुनाचा गुन्हा दाखल! पोलिसांना संशय ः अपहरण नव्हे खूनच?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्यासाठी कामाला आलेल्या ऊस तोडणी कामगारांची 4 वर्षाच्या मुलीचा मृतदेह ब्राह्मणी. जुना वांबोरी रोड रस्त्यालगतच्या विहिरीत आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही चिमुरडी बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीचे वडील शरद गजानन मोरे (वय 35. रा. लोहगाव ता. नेवास)े यांनी मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद राहुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली होती. मुलीच्या वडिलांनी दारूच्या नशेत मुलीची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. राहुरी पोलीस याबाबत अधिक चौकशी करीत असून आज दुपारी उशीरा 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत राहुरी पोलिसांनी मुलीचा कसून शोध घेतला काल रविवार सकाळपासून पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, राहुरी पोलीस निरीक्षक हनुमंत गाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांचेसह राहुरी पोलीस ठाण्याचे आठ पोलीस दंगल नियंत्रण पथकाचे 20 कर्मचारी नगर येथील श्वानपथक राहुरी पोलीस ठाणे वांबोरी दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन मोहीम राबविली आज सकाळी या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिसांना मुलीच्या वडिलांनी दारूच्या नशेत मुलीस मारले असल्याचा संशय आहे. पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. मुलीच्या आईकडून विचारपूस केली जात आहे. मुलीच्या वडिलांना आज अटक होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here