पाणी जपून वापरा- महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

पाणी जपून वापरा- महापौर.

 पाणी जपून वापरा- महापौर.

आज आणि उद्या पाणीपुरवठा विस्कळीत..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाणी उपसा करणार्‍या पंपामध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळा पंपिंग स्टेशन येथील एक पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे, परंतु या कामासाठी वेळ लागणार असल्याने पाणी उपसा बंद राहणार आहे, या कारणांमुळे सोमवारी (15 फेब्रुवारी) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजे झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरूडगाव रोड, सावेडी, पाईप लाईन रोड भागास मंगळवारी (16 फेब्रुवारी) पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच 16रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजे स्टेशन रोड, विनायक नगर, सावेडी उपनगर, बालिकाश्रम
रोड या भागास पाणी पुरवठा होणार नाही व या भागास 17 रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही महापौर वाकळेंनी केले आहे.

No comments:

Post a Comment