घरकुलांचे काम मॉडेलनुसार कमी खर्चात करावे : दौंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

घरकुलांचे काम मॉडेलनुसार कमी खर्चात करावे : दौंड

 घरकुलांचे काम मॉडेलनुसार कमी खर्चात करावे : दौंड

पाथर्डी पंचायत समिती येथे तयार करण्यात येणार घरकुलाचे मॉडेल, भूमिपूजन संपन्न.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पाथर्डी ः कमी खर्चात शासनाने दिलेल्या घरकुलाचे उत्कृष्ट बांधकाम कसे करावे यासाठी पाथर्डी पंचायत समिती आवारात घरकुलाचे मॉडेल बांधण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या मॉडेल नुसार कमी खर्चात उत्कृष्ट बांधकाम करावे असे प्रतिपादन गोकुळ दौंड यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांचे काम कमी खर्चात व चांगल्या पद्धतीने करता यावे यासाठी पाथर्डी पंचायत समिती आवारात घरकुलाचे मॉडेल उभारण्यात येणार आहे. या मॉडेल बांधकामाचे भूमिपूजन  गोकुळ दौंड यांच्या हस्ते झाले प्रसंगी  ते बोलत होते .
यावेळी  रवींद्र वायकर, पं. स. सदस्य सुनील परदेशी, राहुल गवळी, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, एकनाथ आटकर,  उपअभियंता आर. डी. राठोड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी  दराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे
सानप, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, ऋषी पालवे यांच्यासह विविध गावचे ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  या योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांचे काम जास्तीत जास्त पूर्ण करणे बाबतच्या सूचना देखील आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्व ग्रामसेेवकांना देण्यात आल्या पंचायत समिती मध्ये तयार करण्यात येणारे घरकुल चे मॉडेल नुसार लाभार्थ्यांनी ग्रामीण भागात घरकुले बांधावी हा उद्देश ठेवून सदरचे घरकुल पंचायत समिती आवारात तयार करण्यात येणार आहे.  

No comments:

Post a Comment