महावितरणची मनमानी, शेतकर्‍यांची उभी पिके जळाली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

महावितरणची मनमानी, शेतकर्‍यांची उभी पिके जळाली

 महावितरणची मनमानी, शेतकर्‍यांची उभी पिके जळाली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पिंपळगाव माळवी ः सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतीचे पाण्याचा प्रश्न मिटला.परंतु महावितरणकडून शेतकर्‍यांची अडवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे .
   नगर तालुक्यातील पिंपळगाव  माळवी  पंचक्रोशीतील  विहिरि यावर्षी काठोकाठ भरल्या आहेत .त्यामुळे शेतकर्यांनी गहू हरभरा कांदे यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे .पिंपळगाव- वडगाव हद्दीवर असलेल्या पठाण वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर तीन महिन्यांपूर्वी जळाला आहे परंतु महावितरणने अद्याप बदलून दिला नाही .त्यामुळे या परिसरातील पन्नास शेतक यांची उभी पिके जळाली आहेत . यावर्षी विहिरींना पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांनी नगदी पिके संत्रा, कोबी, फ्लॉवर अशी पिके घेतली होती   काही शेतकर्यांनी जनरेटर आणून पिके वाचवली परंतु सर्वात शेतकर्यांना खर्च परवडत नाही .पाणी असून महावितरणमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे .या परिसरातील शेतकरी शिवाजी शेवाळे, हरिभाऊ झिने ,नंदू साबळे ,भाऊराव झिने ,नवनाथ गुडगळ, शंकर कारंडे यांनी महावितरणने ट्रान्सफार्मर बदलून देण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment