कारभारी बदलल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ ः वैभव पिचड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

कारभारी बदलल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ ः वैभव पिचड

 कारभारी बदलल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ ः वैभव पिचड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अकोले ः देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेले मंजूर कामे अकोले तालुक्यात सुरू आहेत. कारभारी बदलेलेमुळे अकोले तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून वर्षभरात एकही नवीन काम आणता आले नाही, अशी सडकून टिका भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सचिव वैभवराव पिचड यांनी केली.
कळस बु येथे माजी आ.पिचड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमीपुजन व उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर होते. यावेळी जिप अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, हभप विष्णू महाराज वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम वाकचौरे, माजी सरपंच कारभारी वाकचौरे, यादव वाकचौरे, डी टी वाकचौरे, निवृत्ती मोहिते आदी उपस्थित होते.
पिचड बोलताना म्हणाले की, अर्थ व बांधकाम समितीचे मा सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकासाच्या दृष्टीने कायम कळस झाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे गेली दहा वर्ष नेतृत्व करत असताना कैलासरावांनी अकोले तालुक्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे.
श्री सिताराम गायकर म्हणाले की, मधुकरराव पिचड यांनी आम्हाला जिल्ह्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यासंधीतून समाज उपयोगी काम केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगळी ओळख कैलासराव यांनी निर्माण केली असल्याचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कळसेश्वर देवस्थान संरक्षक भिंत, भवानी माता मंदिर सभामंडप, सांगवीरोड हरिजन वस्ती रस्ता, जिल्हा परिषद शाळा चार खोल्या, बिबवे वस्ती रस्ता डांबरीकरण या विकासकामांचे भुमीपुजन तर शाळा संरक्षक भिंतीचे उदघाटन करण्यात आले.  
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार प्रा.विवेक वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन नुतन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर वाकचौरे, जिजाबा वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, केतन वाकचौरे, संगिता भुसारी, संगिता चौधरी, स्नेहल वाकचौरे,स्वाती सरमाडे यांचे सह नामदेव निसाळ, गोरख वाकचौरे यांनी केले.

No comments:

Post a Comment