पोलीस दलात दबाव झुगारून काम करण्याला प्राधान्य दिले ः कृष्णप्रकाश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

पोलीस दलात दबाव झुगारून काम करण्याला प्राधान्य दिले ः कृष्णप्रकाश

स्नेहबंध फौंडेशनच्यावतीने गौरव...

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोणत्याही शहरात 99 टक्के लोक कायदा पाळतात. परंतु एक टक्का लोकांमुळे गुन्ह्यांना चालना मिळते, अशा प्रकारच्या लोकांमुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून अशा समाजविघातक प्रवृत्तींनी हे लक्षात घ्यायला हवे की, कायदा सर्वांना सारखा आहे. पोलीस दलात दबाव झुगारून काम करण्याला सतत प्राधान्यच दिले, असे प्रतिपादन आयर्नमॅन चा किताब पटकावणारे पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश प्रसाद यांनी केले.

पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृष्णप्रकाश यांचा स्नेहबंध फौंडेशनतर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी पदक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण जगताप, शिक्षक नेते संजय शिंदे, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, समाजविघातक प्रवृत्ती वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून गुन्हे करतात व  सामाजात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजाने बेकायदेशीर उद्योगापासून दूर रहायला हवे. अशा प्रवृत्तींना पोलीस दलाने थारा देऊ नये. कायद्याचा सन्मान करणार्‍या प्रत्येक व्यक्तिच्या पोलीस सदैव पाठीशी असतात.

No comments:

Post a Comment