सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली ः कर्डिले

 सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली ः कर्डिले

हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी प्रतिष्ठानच्यावतीने कर्डिलेंचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले बहुमताने निवडून आल्याबद्दल हाजी अजीजभाई चष्मावाला व कर्मयोगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने झेंडीगेट येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, शफी जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, नगरेसवक आसिफ सुलतान, नफिस चुडीवाले, डॉ.इमरान शेख, इरफान जहागीरदार, अकलाख शेख, जुनेद शेख, आफताब शेख, जाकीर कुरेशी, हाजी फकिर शेख, आलिम शेख, महेमुद शेख आदी उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य शेतकर्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेची प्रतिमा तयार केली. अनेक चुकीचे प्रकार बंद पाडले. हे शल्य बोचल्याने प्रस्थापितांनी मला बाजूला करण्याचे काम केले. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन प्रमाणिकपणे काम केल्याने या निवडणुकित मताधिक्याने विजय झाला. राजकीय जीवन संघर्षमय असल्याने प्रस्थापितांना न घाबरता जिल्हा बँकेत प्रमाणिकपणे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रफिक मुन्शी यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व म्हणून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची ओळख आहे. शेतकरी व सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन त्यांचे कार्य सुरु असून, लोकनेते म्हणून त्यांची ख्याती सर्वश्रूत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here