डॉ. बागुल यांचे कार्य प्रेरणादायी- नामदार शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

डॉ. बागुल यांचे कार्य प्रेरणादायी- नामदार शिंदे

 डॉ. बागुल यांचे कार्य प्रेरणादायी- नामदार शिंदे

डॉ.अमोल बागुल यांना जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक पुरस्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रतिकूल कालावधीमध्ये देशातील प्रत्येक माणूस कोरोना योद्धा झालेला आहे. अशा कालावधीत सरकार प्रयत्न करत आहेच परंतु त्याचबरोबर जनतेतून स्वयंस्फूर्तीने कोट्यावधी कोरोना योद्धे तयार झाले. कुणी स्वतःचे धन दिले, कुणी अन्न दिले, कुणी स्वतःचा वेळ दिला तर कुणी स्वतःचे कौशल्य वापरून देशसेवेला धावून आला, जागतिक पातळीवर शिक्षकांनी देखील शिक्षणात खंड पडू दिला नाही. यातूनच डॉ.बागूल यांनी शैक्षणिक कामकाजाबरोबरच मृतदेह उचलण्याचे केलेले काम येणार्‍या उद्याच्या नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. राज्यातल्या गुणवंत शिक्षकाची जागतिक पातळीवर घेतली गेलेली दखल ही राज्यासाठी,देशासाठी निश्चितच भूषणावह बाब आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) खात्याचे मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या नियोजन बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल यांना जागतिक आरोग्य संघटना (थकज) यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेले प्रमाणपत्र श्री.शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी श्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार निलेश लंके, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगरसेवक अनिल शिंदे, शशिकांत गाडे, दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
25 मार्च 2020 पासून कोरोना लॉकडाऊन मध्ये गुढीपाडव्यापासून डॉ. बागूल यांनी सुरू केलेल्या ई-लोक शिक्षा अभियानास 25 फेब्रुवारी 2021 रोजी 330 दिवस पूर्ण होत आहेत. यामध्ये सुमारे 94 देशातील 25 लाखांपेक्षा अधिक शिक्षक,पालक,विद्यार्थी सहभागी झाले आहेत.यामध्ये दररोज 100 उपक्रम नियमितपणे  पाठविले जातात.त्याचबरोबर नगर तहसील भरारी पथकातील सहभाग, पोलिसांना रात्री पाणी-अल्पोपहार वितरण,विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोरोनाबाधित मृतदेह उचलण्याच्या व अंत्यविधीच्या कामात सहभाग,सोशल मीडियातून मास्कचा वापर,सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा वापर करणेविषयी प्रबोधन, मुक्या-भटक्या प्राण्यांना खाद्य वाटप व औषध चिकित्सा, विलगीकरण प्रक्रियेतील सहभाग, कोविड सेंटरमधील मदत कार्य आदी उपक्रमाची दखल थकज कडून घेण्यात आली.
डॉ. बागुल यांच्या उपक्रमाबद्दल भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कॅबिनेट शिक्षणमंत्री संजोग धोत्रे, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री ओम प्रकाश कडू, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) रामदास हराळ, शिक्षणाधिकारी (प्राथ) शिवाजी शिंदे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, समन्वयक अरुण पालवे, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन अ‍ॅड किशोर देशपांडे, मुख्या. श्रीम.संगीता जोशी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदींचे मार्गदर्शन व शुभेच्छा डॉ.बागूल यांना लाभल्या आहेत.

No comments:

Post a Comment