महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी ः लांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी ः लांबे

 महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी ः लांबे

कृषिपंपांच्या वीज प्रश्नांबाबत राहुरीत रास्ता रोको आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः महावितरण कंपनीने सुरू केलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात व कृषि पंपाच्या विज प्रश्नांबाबत आज गुरूवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वंचीत बहुजन आघाडी, भारतीय जनसंसद, प्रहार संघटना, बामसेफ भारतमुक्ती मोर्चा, एकलव्य संघटना, आदी विविध संघटनांच्या वतीने तालुक्यातील नेते सुरेशराव लांबे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या सक्तीच्या वीज वसुली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शासनाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू आहे. परंतु वीज वितरणाबाबत शेतकर्यांचा अतिशय महत्वाचा व जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वीज बंद केल्यानंतर शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जळून जातील. त्यामुळे कोरोनाच्या प्रादूर्भावातही शेतकर्यांच्या न्यायहक्कासाठी ऊर्जा राज्यमंत्र्याच्या स्वतःच्या तालुक्यात आज रास्तारोको आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आली.
शासनाने त्वरीत शेतकर्यांचे कृषि पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, कोरोना काळातील घरगुती व व्यापारी यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, जळालेले ट्रान्सफार्मर त्वरीत बदलून द्यावेत व वीज बिल भरण्याची अट घालू नये, मंजूर झालेले नवीन ट्रान्सफार्मर आहे त्या ठिकाणी त्वरीत बसविण्यात यावे आदी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी महावितरणचे अधिकारी नितीन मुरकुटे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांनी निवेदन स्विकारत मागण्या वरिष्ठांपर्यंत कळविण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात सुरेशराव लांबे, केंदळचे मा. सरपंच तथा वंचीतचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण डोंगरे, वंचीतचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष अरूण साळवे, विक्रम गाढे, भारतीय जनसंसदचे कुमार डावखर, आप्पासाहेब माळवदे, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार, बामसेफचे विजय पवार, बाबासाहेब मकासरे, सुनिल तांबे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, निलेश लांबे, शिवाजी लांबे, बिलाल शेख, मारूती बाचकर, सूर्यभान नाईकवाडी, शरद लांबे, रफीक शेख, बाबुराव वीरकर,  बाळासाहेब शिरसाठ, दत्तात्रय कोकाटे, कैलास पवार, गणेश शेंडगे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment