शासनाने विनाअनुदानीत शिक्षकांच्या वेदना समजून घ्याव्यात ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 12, 2021

शासनाने विनाअनुदानीत शिक्षकांच्या वेदना समजून घ्याव्यात ः गाडगे

 शासनाने विनाअनुदानीत शिक्षकांच्या वेदना समजून घ्याव्यात ः गाडगे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिक्षक  भारती संघटनेच्या व शिक्षक संघटना समन्वय समीतीच्या वतीने    दिनांक 29 जानेवारी 2021 पासून आझाद मैदान येथे सुरू असलेल्या अंदोलनाला शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला  सक्रिय पाठिंबा दिला आहे. यावेळी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी शासनाने शिक्षकांच्या वेदना समजून घ्याव्यात असे म्हटले.
13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार घोषित अनुदान मंजूर 20 टक्के व वाढीव 40 टक्के वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने तात्काळ काढावा, तसेच सर्व अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यानांही वेतन निधीही घोषित करावा, या मागणीसाठी हजारो शिक्षक आझाद मैदान येथे ‘जवाब दो’ म्हणत बेमुदत धरणे देऊन बसले आहेत. मागील शासनाने 13 सप्टेंबर 2019 ला आदेश काढून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासाठी घोषित केले व 1 एप्रिल 2019 पासून अनुदान मंजूर केले. तसेच ज्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, 20 टक्के वेतन घेत होत्या, त्यांना वाढीव 40 टक्के वेतन मंजूर केले. नंतर
सत्तांतर झाले व 24 फेब्रुवारी 2020च्या बजेट अधिवेशनात वेतनासाठी लागणार्‍या निधीची पुरवणी सभागृहासमोर मंजूर केली. 20 वर्षांपासून विनावेतन वेठबिगाराच जीवन जगणार्‍या शिक्षकांना हा निर्णय संजीवनी देणारा ठरला; परंतु लवकरच राज्यात कोविड 19 चा कहर सुरू झाला व शासनाने शिक्षकांचे मंजूर वेतन कोरोनाचे कारण पुढे करत टाळले. व बजेट अधिवेशन मागील हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत शिक्षण खात्याकडून सांगितले गेले की जानेवारी महिन्यात या शिक्षकांच्या खात्यात पगार जमा केला जाईल परंतु सर्व तपासण्या पूर्ण झालेल्या असून प्रशासकीय अधिकारी विनाकारण दिरंगाई करत आहेत. यामुळे शसनाविषयी
कमालीचा रोष या विनाअनुदानित शिक्षकांमधे निर्माण झाला आहे, तात्काळ वरील मागण्या मंजुर करून वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने निर्गमित करावा, याच मागणीसाठी
शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 23 शिक्षक संघटना एकत्रित येत आझाद मैदानात 29 जानेवारी पासून जवाब दो, बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत, याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी व शाळांना वेतन अनुदान वितरीत करावे अन्यथा राज्यात शिक्षकांचा मोठा उद्रेक होईल अशी माहिती  शिक्षक नेते सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर,  संभाजी पवार , हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे,  सोपानराव कळमकर. संजय भूसारी. विलास माने. शंकर भिवसने आदींनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here