जीवावर उदार होऊन सेवा देणार्‍या 278 कोरोना योद्ध्यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

जीवावर उदार होऊन सेवा देणार्‍या 278 कोरोना योद्ध्यांचा सन्मान

 जीवावर उदार होऊन सेवा देणार्‍या 278 कोरोना योद्ध्यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ‘घराबाहेर पडणे धोक्याचं, जीवावर बेतणारं अशा लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधित रुग्णाच्या कक्षापर्यंत सेवा देणार्या आरोग्य कर्मचार्यांची नोकरीच्या माध्यमातून जी सेवा घडली ती जनसेवाच ठरली. प्रशासनाबरोबर आरोग्य सेवा देणारे, स्वच्छतेचे काम करणारे, रस्त्यावरील पोलिस आणि जीवनावश्यक वस्तू पुराविणारे दुकानदार या चार विभागातील लोक एकूण लोकसंख्येनुसार तसे मोजके होते. पण, त्यांनी जीवावर उदार होऊन कोरोना प्रादुर्भावच्या काळात जी जनसेवा दिली, त्यामुळे लाखोंचे प्राण वाचविले गेले. जनसेवा देणार्या या लोकांना दररोज सायंकाळी घरी जातांना आणि परिवारात मिसळतांना जे काय घडतं ते भितीच्या सावटाखाली या अवस्थेत त्यांना आणि परिवाराला राहावं लागलं हे नाकारुन चालणार नाही, आरोग्य विभागातील हिवताप कर्मचार्यांनाही या काळात अशीच भुमिका बजवावी लागली त्या 278 अधिकारी, कर्मचार्यांना कोरोना योद्धा सन्मानाने आज नगरमध्ये गौरविण्यात आले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नगर जिल्हा शाखेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
आरोग्य सेवा नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले तर प्रमुख उपस्थितीत जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, सहाय्यक हिवताप अधिकारी संजय सावंत, साथरोग अधिकारी दादासाहेब साळूंके, मध्यवर्ती संघटना नगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ.मुकुंद शिंदे, जि.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर डिसले, सचिव संजय दुस्सा आदि व्यासपीठावर विराजमान होते.
गेल्या 22 मार्च 2020 पासून कोरोनाच्या संकटाशी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रथम प्राधान्य कामाला असे म्हणत दिवस-रात्र कोरोनाशी सामना करत कार्यरत होते. आजही त्यांचे काम थांबलेले नाही. परिस्थिती बदलली पण भिती आजही आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकअधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित होऊन काहींचे निधन झाले आहे. आरोग्य सेवा देतांना मरण येणे अर्थात ते शहीद समजले पाहिजे. अशा स्थितीत ज्यांनी आजपर्यंत कार्यरत राहून अनेकांचे प्राण वाचविले. कोरोना नियंत्रणाकरिता अविरत कार्य करीत असल्याने अशा कोरोना योद्धांचा सन्मान करणे हे कर्तव्यच आहे ते संघटनेने केले, असे अध्यक्षीय भाषणात डॉ.गांडाळ यांनी नमूद केले.
सदर प्रसंगी गोंडगांव येथील आरोग्यसेवक तथा महाराष्ट्रात जुनी पेन्शन लढ्यातील मुलूख मैदान असलेले राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य संघटक संजय सोनार कळवाडीकर यांनीही ‘नोकरी ही सेवाच असते आणि कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ती देणेकर्तव्य आहे ते आपण सर्वांनी केले. पण, जुनी पेन्शन सारखे हक्क मिळणे ते ही गरजेचे असल्याचे सांगितले.प्रारंभी दिवंगत कामगार नेते र.ग.कर्णिक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कोरोना बाधित मयत झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवर व वक्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास ढगे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, सह-कार्याध्यक्ष जनक बागल, उपाध्यक्ष अरुण लांडे, व्ही.बी.वाडेकर, जी.के.भागवत, पी.बी.टकले, ए.एस.गायकवाड,कोषाध्यक्ष वैभव चेन्नूर, डी.एल.मुत्याल, सहचिटणीस के.एस.भिंगारदिवे, एन.एच.पवार, व्ही.ए.गोरे, संघटक एस.एन.गर्जे, मार्गदर्शक पी.डी.कोळपकर, तालुकाध्यक्ष सर्वश्री सागर गायकवाड (नगर), संजय भैलुमे (कर्जत), एस.वाय.कराड (पाथर्डी),डी.जी.पुंड (नेवासा), एस.एफ. भिंगारदिवे (राहाता), एन.एम.वाघ (कोपरगांव), एन.डी.नेवासकर (संगमनेर), जे.बी.कोकाटे (अकोले) आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आउेप व प्रसाद टकले यांनी केले तर आभार श्री.नवगिरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment