मिरी येथे कोविड-19 च्या पहिल्या लसीकरण सत्राची सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

मिरी येथे कोविड-19 च्या पहिल्या लसीकरण सत्राची सुरुवात

 मिरी येथे कोविड-19 च्या पहिल्या लसीकरण सत्राची सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी  ः  पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी सकाळी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करण्यात आली.या सत्राचे उद्घाटन पाथर्डी पंचायत समिती करंजी गणाचे सदस्य एकनाथ आटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या सत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मिरी च्या अंतर्गत येणारे सर्व आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील,तलाठी आदींना पहिल्या टप्प्यातील ही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असून ज्या कर्मचार्‍यांनी ऑनलाईन माहिती भरली आहे त्यांनाच ही लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गाढे यांनी दिली आहे.
यावेळी मिरी गावचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख मान्यवरांसह वैद्यकीय अधिकारी डॉ.गाढे,डॉ.फडतरे मॅडम व आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment