रंगतदार कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

रंगतदार कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध

 रंगतदार कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थ मंत्रमुग्ध

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निमगाव वाघात तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने निमगांव वाघा (ता. नगर) येथे नगर तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार पडली. यावेळी मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते. कोरोना महामारीमुळे तब्बल एक वर्षानंतर गावात कुस्तीचा आखाडा रंगल्याने ग्रामस्थ व कुस्ती रसिकांनी कुस्ती मल्लांना उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
नवनिर्वाचित सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन व  कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, उपसरपंच अलका गायकवाड, देवाचे भगत नामदेव भुसारे, उद्योजक गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, हर्षवर्धन कोतकर, डॉ. विजय जाधव, सचिव बाळू भापकर, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, किरण जाधव, पोपट शिंदे, भागचंद जाधव, कोंडीभाऊ फलके, मुन्नाबी शेख, धनंजय खर्से, सोमनाथ राऊत, किसन वाबळे, चंद्रकांत पवार, सुखदेव जाधव, भानुदास ठोकळ, अतुल फलके, लक्ष्मण चौरे, मयुर काळे, विठ्ठल जाधव, रंगनाथ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच रुपाली जाधव यांनी गावाला उत्कृष्ट कुस्ती मल्लांची परंपरा असून, अनेक खेळाडू गावातून घडले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी देखील प्रोत्साह देण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विजयी मल्ल गादी विभागसाठी महेश शेळके, बुध्दभूषण साळवे, सौरभ शिंदे, संदीप डोंगरे, वैभव फलके, अविनाश मोरे, लौकिक चौगुले, युवराज कर्डिले, माती विभागसाठी वैभव चोपडे, सौरभ मराठे, अक्षय उघडे, विकास गोरे, शुभम वाघ, सुजीत कांडेकर, मनोज फुले तर महाराष्ट्र केसरी गटासाठी मनोहर कर्डिले (माती) व सुदर्शन कोतकर (गादी) या मल्लांची जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहे.

No comments:

Post a Comment