अर्थसंकल्प देशाचे स्वप्न साकार करणार : पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

अर्थसंकल्प देशाचे स्वप्न साकार करणार : पवार

 अर्थसंकल्प देशाचे स्वप्न साकार करणार : पवार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः शेती आणी पायाभूत सुविधांवरती भर असलेले 2021चे अर्थ संकल्प बजेट हे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करणारे असल्याने याबाबत अभिमान वाटुन स्वागत करत असल्याचे मनोगत नेवासे तालुक्यातील भाजपा युवामोर्चाचे सरचिटणीस महेश पवार यांनी व्यक्त केले आहे.या वर्षीचे बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केले आहे.या अर्थसंकल्पाचा निकष प्रामुख्याने देशासाठी,सर्वसामान्यांसाठी, शेतीविषयाबाबतीत चालना,बेरोजगारांसाठी लाभदायक, मंडईमध्ये पारदर्शकता,रस्ते,आरोग्य,प्रदूषण,वृद्धांसाठी हितकारक तसेच उपयुक्त ठरेल.असे पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment