पान स्टॉलच्या नावाखाली खुलेआम गुटखा, मावा विक्री - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

पान स्टॉलच्या नावाखाली खुलेआम गुटखा, मावा विक्री

 पान स्टॉलच्या नावाखाली खुलेआम गुटखा, मावा विक्री


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः कायद्याने गुटखा, मावा, सुगंधीत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, मावा सुपारी यावरती बंदी घालून सुगंधीत तंबाखू कंपन्या बंदही केल्या परंतु नेवासे तालुक्यातील शेवगाव-पांढरीपुल रस्त्यालगत असलेल्या माका या ठिकाणी तसेच परिसरात पान दुकानच्या नावाखाली, प्रशासकीय यंत्रणेचे कुठल्याच बाबतीत भय दिसून न येता खुलेआम सर्रास या सुगंधीत तंबाखू जन्य पदार्थ, तसेच गुटख्याबाबतीत विक्री केली जात असल्याचे सध्यातरी परिसरातील ग्रामस्थांकडुन यासंदर्भात चर्चा केली जात आहे.                                                                        
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पान दुकानच्या नावाखाली काही व्यावसायीक दुकानात मावा गुटखा सोडून दुसरी कुठलीच वस्तु,पदार्थांची विक्री न करता, ठिकठिकाणी भररस्त्यात चौकात उघड्यावरती मावासुपारी सुगंधीतंबाखू पंटरांकडुन घासून मावा गोणी,पोतेच्या मापात साठवणुक करून मोठ्या प्रमाणात 20,40,100 रुपयांपर्यंत दैनंदिनी विक्रीकरून अमाप पैसा गोळा केला जात आहे.तसेच याबरोबर मोठ्या प्रमाणात गुटखा पड्यांचीही विक्री केली जात असल्याचे बोलले जाते.या वस्तू,पदार्थांची बंदी असताना सुद्धा या कोठून व कशा पद्धतीने येतात याबाबत संबधित प्रशासकीय विभागाकडुन चौकशी करून या बेकायदा व्यवहाराने चालू असलेल्या व्यवसायास वेळीच लक्ष देऊन आळा घालणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.                            
याबाबतीत याअगोदर ग्रामस्थांनी संबधित विभागास सह्या करून तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच,  सदस्य, कमीटीच्यावतीने परिसरात बेकायदा गुटखा मावा विक्री केली जात असल्याने या बाबी बंद करण्याबाबत,जिल्हाअधिकारी जिल्हाअधीक्षक कार्यालयास निवेदनं सुद्धा दिली आहेत.तरीही याबाबत संबंधित प्रशासकीय वर्गाकडुन दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ग्रामस्थांनी  वेळोवेळी पुर्वकल्पना देऊनही, कायद्याचे उल्लंघन करणारयां या बेकायदा व्यावसायीक मुजोरांना प्रशासकीय वर्गातुनच अभय मिळते की काय याबाबत सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment