अल-करम हॉस्पिटलच्या शिबिरात 137 जणाचे रक्तदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

अल-करम हॉस्पिटलच्या शिबिरात 137 जणाचे रक्तदान

 अल-करम हॉस्पिटलच्या शिबिरात 137 जणाचे रक्तदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अल-कमर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन सोसायटी, मुकुंदनगर येथील हलिमा क्लिनिक व अल-करम मॅटरनिटी व नर्सिंग होमच्या संयुक्त विद्यमाने नालंबद खुंट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि.फिरोज तांबोळी, डॉ.जहिर मुजावर, मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, डॉ.संध्या इंगोले, डॉ.कवडे, ज्ञानेश्वर मगर आदि उपस्थित होते. या शिबीरासाठी जिल्हा रुग्णालय व अर्पण ब्लड बँकेच्या टिमने रक्तसंकलनाचे कार्य केले.
याप्रसंगी इंजि.फिरोज तांबोळी म्हणाले, कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रातील परिस्थिती सुधरत आहे. परंतु रक्त संकलन कमी होत असल्याने आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थितीत या शिबीराचे आयोजन करुन रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमातून समाजातील आवश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे, असे सांगून संयोजकांचे कौतुक केले.
डॉ.जहिर मुजावर म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एकाजणांच्या रक्तदानाने अनेकांना त्याचा उपयोग होत असल्याने नियमित रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्तदानाने दुसर्याचे तर प्राण वाचतातच परंतु त्याबरोबर आपलेही आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. संस्थेच्यावतीने गरजेच्यावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment