फाईव्हस्टार मानांकनांसाठी नागरिकांचे सहकार्य हवे- डॉ. पैठणकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

फाईव्हस्टार मानांकनांसाठी नागरिकांचे सहकार्य हवे- डॉ. पैठणकर

 फाईव्हस्टार मानांकनांसाठी नागरिकांचे सहकार्य हवे- डॉ. पैठणकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वच्छता अभियानामध्ये मागील वर्षी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामगिरीमुळे देशामध्ये 40 व्या क्रमांकावर आपले शहर झळकले होते. आता यावर्षी फा्ईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांना विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावी, जेणेकरुन शहराच्या नावलौकिकात भर पडेल असंमत मनपाचे घनकचरा विभाग प्रमुख डॉ नरसिंह पैठणकर यांनी व्यक्त केले.

भारत स्वच्छ अभियानांतर्गत अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यावेळी विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी पैठणकर बोलत होते. स्वच्छतेमधील सर्वोच्च फाईव्हस्टार मानांकनासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध भागा जाऊन स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करत आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपले शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होईल. 2019-20 मध्ये भारत स्वच्छ अभियानामध्ये नगर महानगरपालिकेला श्री स्टार मानांकन मिळाले असून, 2020-21 मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी स्वच्छता अभियानात सरसावले आहे, असे ही पैठणकर म्हणाले.
सफाई कर्मचार्‍यांबरोबर महापालिकेचे इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन हातात झाडू घेऊन साफसफाई करतात. तसेच दगड, माती, फुटपाथ, गवत काढण्याचे केले जाते. या स्वच्छता अभियानात नागरिकांनीही सहभाग घेऊन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं.

No comments:

Post a Comment