कांदा मार्केटमध्ये खंडणी वसूल करणारे 3 जण गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

कांदा मार्केटमध्ये खंडणी वसूल करणारे 3 जण गजाआड

 कांदा मार्केटमध्ये खंडणी वसूल करणारे 3 जण गजाआड

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेप्ती कांदा मार्केट येथे खंडणी मागणा-या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली आहे. अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर अहमदनगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा. एकनाथनगर केडगाव), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता. जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फोनवर वारंवार फोन करून तू जमिनीचा व्यवहार मोडला, म्हणून तुला पैसे द्यावे लागतील अशी फोनद्वारे तसेच दुकानात येऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 20,000 रुपये मागितली. त्यानंतर 4 फेब्रुवारीला 4 वाजता दुपारी अक्षय दिलीप कोके व त्याचेबरोबर एक अनोळखी इसम यांनी गाळ्यात येऊन हर्षवर्धन महादेव कोतकर यास फोन लावून देऊन 20,000 रुपये देण्यास सांगितल्याप्रमाणे अक्षय दिलीप कोके यांचेकडे पैसे दिले. त्यानंतर कोके याने कोतकर याला फोन करून सांगितले की, पैसे मिळाले त्याचवेळी साधे गणवेशात बसलेल्या पोलिसांनी आरोपी कोके व त्यासोबत असलेल्या अनोळखी इसम याला पकडून ताब्यात घेतले. यानंर व्यापार महेश जवाहरलाल भराडिया (वय 33 रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) यांना दिलेल्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेल्या आरोपीविरुध्द भादवि कलम 384, 386, 120 ब प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.

नेप्ती कांदा मार्केट मध्ये 3 जणांवर खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात हर्षवर्धन कोतकर यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे कॉल डिटेल्स तपासून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे व कोतकर यांना न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. - संभाजी कदम, माजी शिवसेना शहरप्रमुख

No comments:

Post a Comment