पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परिषद मेळावा पिंपळनेर येथे संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परिषद मेळावा पिंपळनेर येथे संपन्न

 पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परिषद मेळावा पिंपळनेर येथे संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या प्रांगणात डॉ हभप विकासा नंदजी मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परिषद मेळावा संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप मारूती महाराज (शास्त्री ) तुणतुणे ( अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परीषद महाराष्ट्र राज्य हे होते .    यावेळी तालुका अध्यक्षपदी हभप माऊली महाराज खामकर पिंपळनेर तर उपाध्यक्षपदी हभप बाबा महाराज भांड यांची निवड करण्यात आली .  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोकराव सावंत, हभप वेणुनाथ महाराज विखे, हभप बापु हार्दे, हभप चांगदेव महाराज शेळके, सौ रोहणी ताई राऊत ( अध्यक्ष मराठा महासंघ महा . राज्य ) , पांडुरंग रासकर  आदी मोठया संख्येने वारकरी उपस्थित होते . मेळाव्याचे सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले तर आभार माऊली महाराज खामकर यांनी मानले .मेळाव्यासाठी माऊली खामकर,  गणपत शिंदे , बाबाजी वाकळे, दत्तात्रय रसाळ, हनुमंत रसाळ यांनी चांगल्या प्रकारचे  आयोजन केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here