पोलिसाच्या बुलेटची चोरी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

पोलिसाच्या बुलेटची चोरी...

 पोलिसाच्या बुलेटची चोरी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश कक्षात नेमणूकीस असलेले पोलिस हवालदार संजूबाबा किसन गायकवाड यांची रॉयल इन्फिल्ड कंपणीची बुलेट ( क्रमांक एम.जे.एफ.2697) नेवासा फाटा येथील सुयोग मंगल कार्यालयासमोरील त्यांच्या रहात्या घरासमोरुन चोरी झाली आहे.याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस हवालदाराच्याच बुलेटची चोरी झाल्यामुळे ’सद् रक्षणाय.. खलनिग्रहणाय... या बिद्र वाक्यालाच चोरांनी पोलिसांना आवाहन दिले आहे.
  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,संजय किसन गायकवाड (वय 46) रा.सुयोग मंगल कार्यालयासमोर नेवासा फाटा यांच्या राहत्या घरासमोरुन गुरुवार (दि.21 जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास संजय गायकवाड हे पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये बिनतारी संदेश कक्षात नेमणूकीस असतांना ते ड्युटीवर असतांना त्यांच्या बुलेटची अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन पोबारा केला या घटनेची माहीती पोलिस हवालदार गायकवाड यांना झाल्यानंतर अनेकांकडे बुलेटची चौकशी केली माञ ती मिळून न आल्यामुळे अखेर पोलिसाचीच बुलेट चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्याचा केविलवानी वेळ पोलिसावर आली आहे.

No comments:

Post a Comment