23 व्या राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा व्हर्चुअल कांकरिया करंडक स्पर्धेचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

23 व्या राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा व्हर्चुअल कांकरिया करंडक स्पर्धेचा शुभारंभ

 23 व्या राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा व्हर्चुअल कांकरिया करंडक स्पर्धेचा शुभारंभ


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः बालरंगभुमीला समर्पित असलेला राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा ‘व्हर्चुअल कांकरिया करंडक 2020’ स्पर्धेचा शानदार शुभारंभ माऊली सभागृह येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेचे हे 23 वे वर्ष आहे. कोरोनाचे सर्व अटी नियम पाळून सदर स्पर्धा व्हर्चुअल (झुम ऍपवर) घेण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन कांकरिया करंडकच्या प्रथेप्रमाणे बालकलाकार ऋगवेद विधाटे याच्या हस्ते संपन्न झाला. सदर प्रसंगी अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्षा डॉ. सौ. सुधा कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, सहसचिव उमाकांत जांभळे उपस्थित होते.सदर स्पर्धा स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती मानकन्हैय्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात येतात. स्पर्धेचे हे 23 वे वर्ष आहे, यंदाच्या वर्षी अनेक जिल्हयातुन बालकलाकार आपली कला सादर करीत आहेत. कोरोना या संकटावर मात करून या स्पर्धेला खंड पडू न देता ही स्पर्धा झूम वर घेण्यात येत आहे. या वर्षीची ही स्पर्धा कांकरिया करंडकाचे सुरूवातीपासूनचे साथीदार स्व. ऍड. सतीशजी भोपे आणि स्व. बापूराव पंडित यांना समर्पित करण्यात आली आहे अशी माहिती आपल्या स्वागतपर मार्गदर्शन करतांना अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.
   सुरूवातीस नटराज पुजन, दीपप्रज्वलन करून कांकरिया करंडक 2020 चे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की सतत 23 वर्षे कांकरिया करंडकने बालरंगभुमीची सेवा केली आहे. ही बालरंगभुमी ही एकंदरीतच नाटयचळवळीचा पाया आहे. हा पाया समृध्द करण्याचे काम कांकरिया करंडकाने केले आहे. बालमन नाजूक, कोमल, निरागस असते त्याला जसे आपण पैलू पाडू तसे ते घडत जाते. बालनाटय चळवळीचे संस्कार त्यांच्या वयक्तिक जीवनालाही समृध्द व संपन्न करीत असतात. एकंदरीतच बालनाटय चळवळ समाजमन घडवित असते. भविष्य उज्वल करत असते असे पवित्र कार्य करण्याची संधी आम्हाला लाभत आहे. याचा आनंद वाटतो. शेवटी श्री सदाशिव मोहिते यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment