शेवगाव नगरपंचायत नगरसेविका सौ सविताताई नितीन दहिवाळकर यांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद . - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 29, 2021

शेवगाव नगरपंचायत नगरसेविका सौ सविताताई नितीन दहिवाळकर यांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद .

 शेवगाव नगरपंचायत नगरसेविका सौ सविताताई नितीन दहिवाळकर यांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद.

आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह विविध मान्यवरांनी भरभरुन केला कौतुकाचा वर्षाव  

नेवासा - शेवगाव येथील नगरपंचायत नगरसेविका सौ .सविताताई नितीन दहिवाळकर यांनी आयोजित केलेल्या  तिळगूळ वाटप आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी  मोठ्या प्रमाणात हजेरी लावून जबरदस्त असा प्रतिसाद दिला .या वेळी आ. मोनिकाताई राजळे, सौ उषाताई कंगणकर (भाजप महिला शहरप्रमुख ),सौ साधनाताई मुळे, वंदना सावरकर   आणि   वॉर्डमधील अकराशे ते बाराशे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.ज्या ठिकाणी भरदिवसा जायला नागरिक घाबरत असायची अशा ठिकाणी उद्यान उभारून  वृद्धांना जॉगिंग पार्क,  लहान मुलांसाठी झोके , पाळणे आणि इतर मनोरंजनाची साधने सौ .दहिवाळकर यांनी आपल्या विकास निधीतून  उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमप्रसंगी इतर महिला भगिनींसह सौ सीमाताई गवते, मुक्ताताई पानखडे ,सौ दिपाली रोकडे , सौ कल्पना  परदेशी, सौ प्रिती बडदे, सौ वंदना भारदे ,सौ अनुसया क्षीरसागर ,सौ सुनंदा तारू यांच्यासह अनेक भगिनींनी उपस्थिती लावली  तसेच श्री. नितीन दहिवाळकर मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळ अचानक मित्रमंडळाचे संपूर्ण सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नितीन दहिवाळकर यांनी सर्व उपस्थितांचे आणि सहकार्याबद्दल आ.मोनिकाताई राजळे यांचे आभार मानले.

यावेळी आ. मोनिकाताई राजळे यांनी सौ .दहिवाळकर यांचे विशेष कौतुक करताना सांगितले की राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना नगरसेविका म्हणून खूपच कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे  सामाजिक कार्याला स्वत ला वाहून घेऊन त्यांनी महिलांपुढे विशेष असा आदर्श ठेवला आहे वार्डातील विविध कामे विविध प्रश्न आणि संपूर्ण वॉर्डमध्ये चांगल्या सुविधा सौ.सविताताई नितीन दहिवाळकर यांनी दिल्या  आहेत आणि यापुढेही असेच सर्वांना  सहकार्याची भूमिका त्यांची राहील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here