डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, January 29, 2021

डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ

 डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ 

डोंगरगण ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी-जंगले शास्त्री महाराज


नगर - 
प्रभू श्रीराम हे सर्वांचे आराध्य आहेत.पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होत आहे.याचा सर्वांना अभिमान आहे.श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे ही भावना रामभक्तांची आहे.डोंगरगण ही श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.डोंगरगण येथे श्रीरामाचे वास्तव्य होते.याचे दाखले पुराणात आहेत.या परिसरातील लोक रामभक्त आहेत.अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात जास्तीत जास्त निधी देऊन श्रीरामाच्या कार्यात सर्वानी हातभार लावावा.असे आवाहन जंगले शास्त्री महाराज यांनी केले.डोंगरगण व मांजरसुंबा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ जंगले शास्त्री महाराज यांच्या हस्ते निधीच्या पावती पुस्तकाचे पूजन करून करण्यात आला.याप्रसंगी अभियानाचे जिल्हाप्रमुख गजेंद्र सोनवणे,सहप्रमुख अनिल रामदासी,संघाचे तालुका कार्यवाह बंडू मामा काळे,सरपंच सर्जेराव मते,सदाशिव पवार,रखमाजी खण्डागळे,देविदास खेत्री व जंगले शास्त्री महाराजांच्या आश्रमातील बाल वारकरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियान जिल्हा सहप्रमुख अनिल रामदासी म्हणाले कि,अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.गावोगावी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाचे उस्फुर्तपणे स्वागत होत आहे.गावोगावी रामभक्त मोठ्या संख्येनी सहभागी होऊन श्रीरामाचे कार्य करीत आहेत.प्रत्येकाच्या मनामनामध्ये श्रीरामाचा भाव जागृत झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here