पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

 पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत मुंबईहून हेलिकॉप्टरने भंडारदराकडे प्रयाण. सकाळी 9-45 वाजता यश रिसोर्ट, शेंडी, भंडारदरा येथे आगमन व राखीव. सकाळी 10-30 ते दुपारी 12-30 वा. माजी आमदार कै. यशवंतराव भांगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता भंडारदरा येथून खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत हेलिकॉप्टरने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 1-30 वाजता अहमदनगर येथे आगमन व राखीव. (स्थळ- आमदार संग्राम जगताप यांचे निवासस्थान). दुपारी 2-30 वाजता डॉ. राकेश गांधी यांच्या सुरभि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्धाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- गुलमोहोर रोड कॉर्नर,सावेडी). दुपारी 3-45 ते सायं 4-15 डॉ. सागर गडाख यांचे अ‍ॅपल हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- एमआयडीसी). सायंकाळी 4-30 वाजता अहमदनगर येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण. सोमवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 10-30 वाजता पुणेहून अकोळनेर (ता.नगर) येथे आगमन व तेथील जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीएफसी) इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स. 11-30 वाता अकोळनेर येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह  येथे आगमन व राखीव. दुपारी 1 ते 4 या कालावधीत जिल्हा नियोजन समिती बैठक, सूरत-नाशिक-अहमदनगर ग्रीन फील्ड रोड प्रोजेक्टबाबत लोकप्रतिनिधींना प्रकल्पाचे सादरीकरण. (स्थळ- माऊली सभागृह, सावेडी). सायंकाळी 5 वाजता तनपुरे ट्रॅक्टर्सच्या शोरुमचे उद्धाटन. (स्थळ बोल्हेगाव फाटा, नागापूर.). सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव (मुक्काम). मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9-15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- पोलीस परेड ग्राऊंड, अहमदनगर). सकाळी 10 वाजता अहमदनगर येथून मोटारीने अणूशक्तीनगर, वरवंडी (ता. राहुरी) कडे प्रयाण आणि सकाळी 10-30 ते 1-30 वा. तेथील हिन्दुस्थान अ‍ॅग्रो कोऑपरेटीव लि. प्रकल्पाची पाहणी, प्रकल्प सादरीकरण. दुपारी 1-30 वाजता अणुशक्तीनगर, वरवंडी येथून भाळवणी, ता. पारनेर येथे प्रयाण. दुपारी 2-30 वाजता भाळवणी येथे आगमन व साईराज पतसंस्था या संस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्धाटन. दुपारी 3-30 वाजता भाळवणी येथून मुंबईकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here