आपटे मूकबिंधर विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

आपटे मूकबिंधर विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

 आपटे मूकबिंधर विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दरवर्षी 21 जानेवारी रोजी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा कै. डॉ. कलाताई जोशी यांच्या जयंतीदिनी कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वाचाकौशल्य आणि कर्णबधिर क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्य शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धा कोविड - 19 मुळे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आल्या. या स्पर्धेस राज्यभरातून विशेष शाळांतील 140 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना समारंभपूर्वक विद्यालयात गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रेवती देशपांडे, सचिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, अहमदनगर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मा. देविदास कोकाटे व वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता मा. दिनकर नाठे, मा. अ‍ॅड. श्री सुभाष काकडे, मा. अ‍ॅड चेतन रोहकले, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी,   डॉ. ओजस जोशी, डॉ. धनंजय कुलकर्णी,  डॉ. जयंत क्षीरसागर, राजस जोशी व सौ. रश्मीताई पांडव हे संस्था पदाधिकारी हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालय व संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश रेवती देशपांडे म्हणाल्या की, प्रयत्नांची शिकस्त नेहमी करणे गरजेचे आहे. कर्णबधिरांशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य महत्वाचे आहे. या मुलांना घडविणारे शिक्षक कौतुकास पात्र आहेत. संस्था खुप पवित्र काम करत असून आपणास आमच्या माध्यमातून काही मदत हवी असल्यास ती निश्चीत स्वरुपात करु, या स्पर्धा उपक्रमास मी मनापासून उत्तरोत्तर सुयश चिंतीते. सर्व यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन करते उत्तरोत्तर आपल्या हातून कर्णबधिरांची उत्कृष्ट सेवा घडो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.या वाचाकौशल्य स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ वयोगटनिहाय पुढीलप्रमाणे वयोगट - 9 ते 12 चि. सर्वेश निलेश तांडेल, नाशिक कु. प्रज्ञा अशोक आदमाने, पुणे चि, प्रथम अविनाश भानुशाली, मुंबई कु. हबीबा जावेद सुतार, कोल्हापूर, वयोगट - 12 ते 15 कु. हुदा महेबुब हुसैन, मुंबई चि. समर्थ संदीप डाके, नाशिक चि. अब्दुलसत्तार अत्ताउल्लाह शेख, भिवंडी चि चैतन्य दिनेश मोरे,उमरगा, उस्मानाबाद, वयोगट - 15 ते 18 कु. साक्षी दत्तात्रय लांडगे, पुणे ,कु. काव्यांजली समीर जंगले,नाशिक कु. ईशिका अभिमन्यू गुप्ता, मुंबई ,चि. कृष्णा विष्णु आंधळे जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, अहमदनगर असे होते. तर शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य व्हिडीओ निर्मीती स्पर्धेतील विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक सौ. आयेशा युसूफ शेख, चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी, पुणे, द्वितीय क्रमांक सौ. सरिता सतिश ससाणे, हडपसर कर्णबधिर विद्यालय, पुणे -28 ,तृतीय क्रमांक श्रीमती भावना भालचंद्र नान्नजकर, निवासी मूकबधिर विद्यालय, उमरगा,जि. उस्मानाबाद, उत्तेजनार्थ  श्री.विश्वराद्य महादेव होनमुर्गीकर, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, डेफ स्कुल तिळवणी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, व श्री. रमेश कचरु भालेराव, आयुमंगलम निवासी मूक बधिर विद्यालय, बीड. असे होते. या सर्व स्पर्धक विजेत्यांचा प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देवून पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पाहुण्यांचा परिचय  झावरे बी.बी, यांनी करून दिला या फार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सुदाम चौधरी सर यांनी केले तर आभार शिवानंद भांगरे सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here