समाजकल्याण विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

समाजकल्याण विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

 समाजकल्याण विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सन 2019-20 या वर्षातील शिष्यवृत्तीसंदर्भात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तसेच सन 2020-21 या वर्षात महाडिबीटी पोर्टलवर भरण्यात येणा-या या अर्जांच्या अनुषंगाने महाविद्यालयांचे प्राचार्य व शिष्यवृत्ती कामाकाज पाहणारे कर्मचारी यांची दिनांक 12 जानेवारी, 2021 रोजी न्यू आटर्स, कॉमर्स ण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर या ठिकाणी राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेमध्ये अनु. जाती, विभाजन, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील सन 2019-20 या वर्षातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांच्या स्तरावर प्रलंबित अर्ज त्रृटीपूर्तता करुन तात्काळ जिल्हा स्तरावर ऑनलाईन पध्दतीने फॉरवर्ड करणेबाबात व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर भरुन शासन निर्णय 1 नोव्हेंबर, 2003 मधील अटीशर्तीनुसार अर्जांची पडताळणी महाविद्यालयाने करुनच पात्र अर्ज पुढे पाठविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर अपात्र अर्जांची त्रृटीपूर्तता महाविद्यालय स्तरावर करुन घेण्याबाबत सुचित करण्यात आले.
तसेच महाडिबीटी पोर्टल सुरु झाल्यापासून (2018-19) महाविद्यालयांकडून जिल्हा लॉगीनवर प्राप्त होत असणा-या अर्जांमध्ये वारंवार येत असणा-या त्रृटीबाबतही राधाकिसन देवढे , सहायक आयुक्त, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर महाविद्यालयांच्या महाडिबीटी प्रणालीतील अडचणींबाबत देविदास कोकाटे(विशेष अधिकारी वर्ग-2) यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयांच्या हलगर्जीपणामुळे एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदरी घेण्याबाबत तसेच महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याकरिता दिनांक 30 जानेवारी, 2021 हि अंतिम दिनांक असल्याने सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरुन घेणेबाबत सर्व प्राचार्य व शिष्यवृत्ती कामकाज पाहणारे कर्मचारी यांना सुचित करण्यात आले.

No comments:

Post a Comment