कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद

 कोरठण मंदिर यात्राकाळात दर्शनासाठी बंद

प्रशासन, देवस्थान समिती, मानकर्‍यांच्या बैठकीत निर्णय

यात्राकाळात कोरठण गडावर येणारे सर्व रस्ते दोन कि.मी.अंतरावर अडविण्यात येतील त्यामुळे याकाळात  भाविकांनी येऊ नये असे आवाहन पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी यावेळी केले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव पौष पौर्णिमेला दि.28 ते 30 जानेवारी दरम्यान येत आहे या काळात भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन देवस्थान समिती व मानकर्याच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव याअगोदरच रद्द करण्यात निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान यात्रा उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मानाच्या काठ्या व पालख्या प्रतिकात्मकरित्या मर्यादित स्वरूपात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियम पाळून खंडोबा दर्शनासाठी येतील असे यावेळी ठरविण्यात आले
याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, गटविकास अधिकारी किशोर माने, विश्वस्त अश्विनी थोरात, अमर गुंजाळ, किसन धुमाळ, बन्सी ढोमे, महेंद्र नरड, चंद्रभान ठुबे, हनुमंत सुपेकर,  किसन मुंढे, माजी उपाध्यक्ष रामदास मुळे,तान्हाजी मुळे, भालचंद्र दिवटे, मोहन रोकडे यांच्यासह अधिकारी, मानकरी उपस्थित होते. मानाच्या काठी व पालखीसोबत प्रत्येकी दहा भाविकांना परवानगी दिली जाणार असुन या भाविकांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून परवाने दिले जातील तसेच या भाविकांकडे वैद्यकीय तपासणीचे दाखले आवश्यक असल्याचे निरिक्षक  बळप यांनी सांगितले मानाच्या बेल्हे व ब्राह्मणवाडा येथील काठ्या शासकीय पुजेनंतर एकाच वेळी कळस व देवदर्शन घेतील असे तहसिलदार ज्योती देवरे यांनी स्पष्ट केले  तसेच सर्वच मानाच्या काठ्यांची उंची 21 फूट राहिल असे यावेळी ठरविण्यात आले आभार यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष किसन धुमाळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment