आपणही देशासाठी काही देणे लागतो ः बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

आपणही देशासाठी काही देणे लागतो ः बोज्जा

 आपणही देशासाठी काही देणे लागतो ः बोज्जा

सहज भुवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहज भुवन गोविंदपुरा अहमदनगर येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन सहजयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा  यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना श्रीनिवास बोज्जा  म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले असून आपणही या देशासाठी काही तरी देणे लागतो हा उद्देश मनामध्ये ठेवून देशसेवा करण्यामध्ये खारीचा वाटा उचलावा. परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकवेळा जेलमध्ये गेले असून माताजींचे संपूर्ण कुटुंबीय देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सहभागी झाले होते. आज आपण सहजयोगाचा प्रचार प्रसार करून मानवामध्ये संतुलन आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्रीनिवास बोज्जा  यांनी केले.
यावेळी सहजयोग  परिवारातील जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे, गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे,अंबादास येन्नम,चंद्रशेखर सोनवणे, दांगडे मेजर, लक्ष्मण अंदे, वाय प्रकाश टेलर,  दिपक गिरमे वाकचौरे काका, उमेश तोगे, मनोज वाकचौरे, वसंत बोटकर,  सोमेश थोरात, मोहन रच्चा व  सावंत काका आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment