कोरोनाच्या काळात आ. जगतापांनी माणुसकी जपली : नगरसेविका बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

कोरोनाच्या काळात आ. जगतापांनी माणुसकी जपली : नगरसेविका बारस्कर

 कोरोनाच्या काळात आ. जगतापांनी माणुसकी जपली : नगरसेविका बारस्कर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहर विकासाला प्राधान्यक्रम देत आपल्यावर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूच्या संकट काळामध्ये माणूस माणसापासून लांब गेला होता. परंतु आ. संग्राम जगताप यांनी कोरोना रुग्णांना भेटून आपुलकीने विचारपूस करून आरोग्य सेवेबरोबरच औषधे उपलब्ध करुन देण्याचे काम केले. आमच्या घरातही कोरोनाचे संकट आल्यावर प्रत्यक्ष रुग्णालयात येऊन भेट देऊन धीर व आधार दिला, असे प्रतिपादन नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी केली.

प्रभाग क्र. 1 च्या नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून छत्रपती कॉलनी, जिजामाता कॉलनी, लालगुलाब कॉलनी या
परिसरातील रस्ते मजबुतीकरण व डांबरकीरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, चारुदत्त भणगे, आनंद येमूल, विनोद माळी, राजू सोनवणे, मयूर दारकुंडे, जितेंद्र राजेभोसले, अक्षय भालेराव, दत्तात्रेय राजेभोसले, राजेंद्र सोनवणे, शंकर जाधव, विजय माने, डॉ. अशोक भोजणे, विनोद तांभारे, अर्जुन अष्टेकर, अरुण धामणे, रामभाऊ हापसे, लखन हापसे, भागचंद बालवे, संजय टोपे, बापू भापकर, तुकाराम कुटे, सुरेश उमक, बबनराव बर्डे, मनोज शुक्ला, चंदू गुरव, योगेश ठुबे, शिवाजी डोके आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, पुढील दोन वर्षामध्ये विकसित शहर आपल्याला बनवायचे आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करावयाची आहे. शहरातील अनेक विकासकामे मंजूर आहेत. सरकारकडे शहर विकासाचा आराखडा दिला आहे. आपल्या मालकीचे सुसज़ असे नाट्य संकुलाचे कामही मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य सरकार व जिल्हा नियोजनमधून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे कामही लवकरच मार्गी लागेल. आकाशवाणी ते भिस्तबाग चौक व महालापर्यंतचा रस्ताही मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. असे ते म्हणाले.
सौ. बारस्कर म्हणाल्या, हातावर पोट भरणार्‍यांना आ. जगतापांनी अन्न धान्य व किराणाच्या माध्यमातून मदत करुन कोरोना काळात त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून आणले. प्रभाग क्र. 1 च्या विकासाला त्यांनी नेहमीच मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. आ. संग्राम जगताप यांनी छत्रपती कॉलनी येथे मनपाची खुली जागा असून या ठिकाणी महिलांसाठी योगा हॉल व विविध खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावा, आम्ही सर्व चारही नगरसेवक प्रभाग विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत,
यावेळी विरोधीपक्ष नेता बारस्कर म्हणाले की, नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी या कॉलनीतील अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन आणला. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कचर्‍याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आरोग्याची समस्या सुटली आहे. पाणीप्रश्नही लवकरच मार्गी लागेल. कचरा गाड्या नियमित प्रभागात येत आहेत. पथदिव्यांचा प्रश्नही सुटेल. यावेळी त्यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here