कन्याकुमारी ते काश्मीर पायी निघालेल्या पंडलुवल्डू भरत यांचे रोटरी क्लबच्यावतीने नगरमध्ये स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

कन्याकुमारी ते काश्मीर पायी निघालेल्या पंडलुवल्डू भरत यांचे रोटरी क्लबच्यावतीने नगरमध्ये स्वागत

 कन्याकुमारी ते काश्मीर पायी निघालेल्या पंडलुवल्डू भरत यांचे रोटरी क्लबच्यावतीने नगरमध्ये स्वागत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गेल्यावर्षी करोना व लॉकडाऊन काळात डॉक्टर, पोलीस व सामाजिक संस्थांनी संपर्ण भारतात मानवतेच्या भावनेने सर्वसामान्य गरजूंना आधार देत मदत कार्य केले. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत धन्यवाद देण्यासाठी कर्नाटक मधील मैसूर येथील रोटरी क्लबचे सदस्य पंडलुवल्डू भरत हे ‘ वॉक फॉर ह्युमिनीटी ’ चा संकल्प करत कन्याकुमारी ते काश्मीर असे चार हजार किलोमीटरच्या पायी प्रवासास गेल्या 11 डिसेंबर पासून निघाले आहेत. श्री.भरत नगरमध्ये आले असता त्यांचे नगरच्या सर्व रोटरी क्लबच्या वतीने प्रेमदान चौकात उत्साहात स्वागत करणायत आले. जेष्ठ रोटरीयन धनेश बोगावत यांच्या हस्ते पंडलुवल्डू भरत यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, रोटरी मिडटाऊन क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे, रोटरी सेन्ट्रल क्लबचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सतीश शिंगटे, चेतन अमरापूरकर आदी उपस्थित होते.
क्षितिज झावरे म्हणाले, रोटरी क्लब संपूर्ण जगात मोठे सामाजिक व मदत कार्य अविरतपणे करत असतांना रोटरीचे सदस्य देशभर राष्ट्रीय एकात्मतेसाठी भरीव योगदान देत आहे. मानवतेच्या भावनेने प्रेरित होवून संपूर्ण भारतभर पायी प्रवासास निघालेले पंडलुवल्डू भरत हे नगर मार्गे पुढे जाणार आहेत हे कळल्यावर नगरच्या सर्व रोटरी क्लबच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांच्या या महान कार्यास सलाम.
अ‍ॅड. अमित बोरकर म्हणाले, रोटरीयन पंडलुवल्डू भरत हे मोठ्या प्रेरणादायी उद्देशाने पायी भारत भ्रमणास निघाले आहेत. त्यांच्या या कार्याचा अभिमान आम्हा सर्वांना वाटत आहे.
यावेळी प्रसन्न खाजगीवाले यांनी नगरमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून करोना काळात झालेल्या मदत कार्याची माहिती दिली.
यावेळी पंडलुवल्डू भरत यांची रोटरी क्लब सेन्ट्रलच्या वतीने नगरमध्ये मुक्कामची व्यवस्था करण्यात आली. तसेच पायी प्रवासाने त्यांचे बूट झीजल्याचे लक्षात येताच त्यांना उच्चदर्जाचे नवे बूट देण्यात आले. शिर्डी मार्गे पुढील प्रवासास निघतांना पंडलुवल्डू भरत यांनी नगरच्या रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या आदरतिथ्या बद्दल आनंद व्यक्त करत आभार मानले.

No comments:

Post a Comment