जिल्हा बँक निवडणूक; पात्र उमेदवारांची यादी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

जिल्हा बँक निवडणूक; पात्र उमेदवारांची यादी जाहीर

 जिल्हा बँक निवडणूक; पात्र उमेदवारांची यादी जाहीर

21 जागांसाठी 195 उमेदवार रिंगणात.

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा बँक निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या 312 उमेदवारी अर्ज वरील हरकती व सुनावइ आज पूर्ण झाली असून 117 अर्ज बाद होऊन 195 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
   जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे यंदा सर्वांचेच लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.महाविकास आघाडी विरोधात भाजप असे या निवडणुकीचे चित्र असले, तरी प्रत्यक्षात समोर व पडद्याआड वेगळ्या युती व समेट घडण्याच्या शक्यता आहेत. 21 जागांसाठी 312 उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन आता 195 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. 21 जागांमधून 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 20 फेब्रुवारीला जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here