सरपंचपद आरक्षण सोडत : काहींचा हिरमोड तर काहींना लॉटरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

सरपंचपद आरक्षण सोडत : काहींचा हिरमोड तर काहींना लॉटरी

 सरपंचपद आरक्षण सोडत : काहींचा हिरमोड तर काहींना लॉटरी


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ःनगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींचा  सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम  नुकताच  पार पडला  असून सरपंच पदाची  आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी शहरातील न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या राजश्री शाहू हॉल याठिकाणी पार पडली. या आरक्षण सोडतीत काहींचा हिरमोड झाला तर काहींना लॉटरी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या आरक्षणामुळे काठावर सत्ता मिळविलेल्या काही गावांची राजकीय समीकरणे बदलली आहेत.
   प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या
उपस्थितीत गुरुवारी (दि.28) आरक्षण प्रक्रिया पार पडली.  आगामी 2021- 2025 च्या मुदतीसाठी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित होणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश  पाटील यांनी दिली. या प्रक्रियेसाठी तहसील प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली.
   आगामी  काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत  सरपंच पदाचेही आरक्षण निघाल्याने त्या त्या गाव पुढार्‍यांनी आत्तापासूनच ग्रापंचायतीची तयारी सुरु केली आहे.
सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला) - बाबुर्डी घुमट, रांजणी, पारेवाडी, सारोळा बद्धी, पिंपळगाव माळवी, भोयरेखुर्द, गुंडेगाव, रुईछत्तीशी.
अनुसूचित जाती प्रवर्ग (व्यक्ती) : कर्जुनेखारे, शिराढोण, दशमीगव्हाण, गुणवडी, उदरमल, घोसपुरी, खातगाव टाकळी, हमीदपूर.
अनुसूचित जाती प्रवर्ग : धनगरवाडी  (महिला), बुरुडगाव (महिला), पिंप्री घुमट  (व्यक्ती).
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : भातोडी पारगाव,
राळेगण , बाराबाभळी, कौडगाव, पिंपळगाव वाघा, कापूरवाडी, पिंपळगाव उज्जेनी, देवगांव, दरेवाडी, निमगाव वाघा, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, शेंडी, पिंपळगाव लांडगा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती) : माथणी/बाळेवाडी, मदडगाव, सोनेवाडी, नवनागापूर, वडगाव तांदळी, चास, वाटेफळ, हिवरे झरे, मांडवे, आंबिलवाडी, वाळकी, टाकळी काझी, साकत खुर्द, सोनेवाडी(चास).
सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) : डोंगरगण, वारुळवाडी, बारदरी, नारायणडोहो, हिंगणगाव, नेप्ती, आठवड, दहिगाव, मजले चिंचोली, निमगाव घाणा, जेऊर, निंबोडी, कोल्हेवाडी, टाकळी खातगाव, भोयरे पठार, वडारवाडी, रतडगाव, आगडगाव, वाकोडी, हिवरे बाजार, वडगाव गुप्ता, देहरे, उक्कडगाव, पिंपळगाव कौडा, मेहेकरी, बहिरवाडी, देऊळगाव सिद्धी, इसळक, मांजरसुंबा.

सर्वसाधारण प्रवर्ग : नांदगाव, इमामपूर, अरणगाव, खंडाळा, पारगावमौला, हातवळण, नागरदेवळे, चिचोंडी पाटील, भोरवाडी, आव्हाडवाडी, सांडवे, अकोळनेर, बुर्‍हाणनगर, पोखर्डी, खोसपुरी, पारगाव भातोडी, खांडके, पांगरमल, तांदळी वडगाव, शिंगवे, विळद, जखणगाव, वाळूंज, निंबळक, मठपिंप्री, ससेवाडी, कारगाव, शहापूर केकती, खडकी.

No comments:

Post a Comment