कशासाठी.. बिलासाठी?. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

कशासाठी.. बिलासाठी?. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली..

 कशासाठी.. बिलासाठी?. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली..

ठेकेदारांचे उपोषण; मनपाचे दुर्लक्ष.

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः 2020 कोरोनाच्या आपत्तीमुळे आर्थिक चक्र मंदावले..छोट्या ठेकेदारांनी इकडून तिकडून पैशाची जमवाजमव करून मनपाची कामे पूर्ण केली.पण मनपा प्रशासन ठेकेदारांची छोटी देयके देण्यास विलंब करीत असल्यामुळे ठेकेदारांनी 25 तारखेपासून महापालिकेसमोर उपोषण सुरू केलंय. आज उपोषणाचा तिसरा दिवस तरी मनपा प्रशासनाला अजून जाग आली नाही. उपोषणाला अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला. खा. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, सामाजिक संघटनांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आता उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तरी मनपा प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे.
कोरोनानंतरच्या संकटानंतर आर्थिक परिस्थिती खालवल्याने महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची आरोग्य परिस्थितीही खालवल्याची वेळ आली आहे. उपोषणकर्त्यांची आरोग्य परिस्थिती खालवत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्या मोठ्या रकमेच्या देयकांची रेग्युलर आणि थकीत अशी दोन ज्येष्ठता याद्या आहेत. यातील देयके ज्येष्ठता यादीनुसार अदा केले जात होते. तसेच दोन-तीन वर्षापासून नगरसेवक स्वच्छा निधी या लेखाशिर्षका खालील देयके क्रमवारी प्रमाणे वर्षातून सर्व देयके अदा करून संपवली जातात. परंतु 50 हजार पेक्षा कमी रकमेची देयके जेष्ठता यादी केलेली आहे. परंतु ही छोटी देयके अदा करण्यात आलेली नाहीत. अशी छोटी कामे आपत्तीजनक व अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी करून घेण्यात आलेली आहे. अशी कामे करणारे ठेकेदार हे साधारण परिस्थितीतले आहेत त्यातच सन 2020 हे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावात गेले. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नसल्याने सदर देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी सोमवार दि.25 जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते. थकित देयके मिळत नाही तो पर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला आहे.
   या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकाश पोटे, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, नवेद शेख, समीर शेख, जुनेद शेख, मोहसीन शेख आदी  सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here